रिया सिंघा बनली सोन्याची चिडिया

18 Nov 2024 18:08:41
Riya Singha मिस युनिव्हर्स 2024 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी रिया सिंघा राष्ट्रीय वेशभूषा फेरीत आकर्षक "गोल्डन बर्ड" थीम असलेल्या पोशाखात रंगमंचावर दिसली.तिने भारतीय समृद्ध संस्कृतीची झलक सादर केली. तेव्हा सर्वांचे लक्ष वेधले गेले. तिच्यावर सर्वांच्या नजरा थांबल्या होत्या.तिच्या या ड्रेसची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली.
मिस युनिव्हर्स 2024 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी रिया सिंघा जेव्हा 'गोल्डन बर्ड' थीमवर आधारित ड्रेसमध्ये स्टेजवर रॅम्पवर चालताना दिसली. तेव्हा ते दृश्य आश्चर्यकारक होते. तिचा हा जबरदस्त पोशाख व्हिएतनामी डिझायनर नुएन एनगोक तू यांनी डिझाइन केला होता. डिझायनरने इंस्टाग्रामवर सांगितले की, या ड्रेसचा उद्देश भारताच्या सुवर्णकाळातील समृद्धता व सांस्कृतिक वारसा अधोरेखित करणे आहे.
 
  
riya singha
 
 
या गोल्डन Riya Singha ड्रेसमध्ये रिया खरोखरच अप्रतिम दिसत होती. किंबहुना, संपूर्ण इतिहासात भारताची प्रतिमा सोन्याच्या पक्ष्यासारखी राहिली आहे आणि या रचनेने त्याची प्रेरणा यातून घेतली आहे. भारताच्या भूतकाळात ज्या समृद्धी, संपत्तीव समृद्धीचे प्रतीक आहे.व्हिएतनामी डिझायनर गुयेन न्गोक तु यांनी सांगितले की, हा पोशाख प्रत्यक्षात गुप्त काळातील कलात्मक, वैज्ञानिक आणि तात्विक उपलब्धी सादर करतो. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
परंतु, रिया सिंघा ७३ व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत टॉप १२ मध्ये पोहोचू शकली नाही. त्यामुळे, करोडो भारतीयांची मने तुटली. ही स्पर्धा रविवारी मेक्सिकोमध्ये आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये, मेक्सिको, नायजेरिया, थायलंड, व्हेनेझुएला, डेन्मार्क यांनी टॉप ५ मध्ये स्थान मिळविले. तर मिस युनिव्हर्सचा किताब डेन्मार्कच्या नावावर झाला.
आता प्रश्न असा पडतो की, भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गुजराजच्या १९ वर्षीय रिया सिंघाने मिस युनिव्हर्सचा किताब कसा गमावला? वास्तविक, रिया सिंघाने मिस युनिव्हर्स 2024 स्पर्धेत विशेषत: राष्ट्रीय पोशाख फेरीत चांगली कामगिरी केली. पण तिला टॉप 20 मध्ये स्थान मिळवता आले नाही.
रिया सिंघा या Riya Singha वर्षाच्या सुरुवातीला मिस युनिव्हर्स इंडिया ब्युटी पेजंटची विजेती देखील होती. यावेळी, भारताला या वर्षी चौथ्यांदा हा किताब जिंकण्याची संधी होती. यापूर्वी, सुष्मिता सेन, लारा दत्ता व हरनाज संधू यांनीही हा किताब पटकावला होता.
Powered By Sangraha 9.0