संबंध सुधारण्यासाठी मोदी-जिनपिंग सहमती लागू करा

19 Nov 2024 20:47:01
- चिनी परराष्ट्र मंत्र्याचे जयशंकर यांना आवाहन
 
बीजिंग, 
India and China : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी रशियातील शिखर परिषदेत साधलेल्या महत्त्वपूर्ण सहमतीची भारत आणि चीनने अंमलबजावणी करावी, असे चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांनी रिओ दि जानेरियो येथे जी-२० परिषदेच्या पृष्ठभूमीवर झालेल्या बैठकीत एस. जयशंकर यांना केले.
 
 
Modi-Jinping
 
India and China : मागील महिन्यात कझान येथे झालेल्या ब्रिक्स परिषदेच्या वेळी जिनपिंग आणि मोदी यांच्यातील यशस्वी भेट आणि चीन-भारत संबंध पुन्हा सुरू होणे या दोन्ही देशांच्या मूलभूत हितसंबंधांच्या अनुरूप आहेत. दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी महत्त्वाच्या सहमतीची अंमलबजावणी दोन्ही पक्षांनी करावी. परस्परांच्या मूळ हितांचा आदर करावा, संवादाद्वारे परस्पर विश्वास वाढवावा, मतभेद प्रामाणिकपणाने आणि सचोटीने हाताळावे तसेच द्विपक्षीय संबंध पुन्हा स्थिर आणि सुदृढ करावे. वांग-जयशंकर यांची जी-२० शिखर परिषदेच्या पृष्ठभूमीवर सोमवादी रिओ दि जानेरियो येथे भेट झाल्याचे चीनमधील सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0