आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त घरातील पुरुषांना द्या हे गिफ्ट

19 Nov 2024 12:32:03
International Men's Day आंतरराष्ट्रीय पुरुष दिन दरवर्षी १९ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. याबद्दल, फार कमी लोकांना माहिती आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या घरातील पुरुषांना म्हणजेच वडील,भाऊ किंवा पतीला हा खास दिवस खास बनवण्यासाठी गिफ्ट देऊ शकता. जे पाहून त्यांना आनंद होईल. पाहूया कोणत्या आहेत त्या भेट वस्तू.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन दरवर्षी १९ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. आरोग्य, शिक्षण व त्यांच्या कुटुंबाप्रती पुरुषांच्या जबाबदाऱ्या समजून घेणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची सुरुवात १९९९ मध्ये झाली. वेस्ट इंडीज विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. जेरोम तिलक सिंग यांनी या दिवशी त्यांच्या वडिलांचा वाढदिवस साजरा केला. हा दिवस स्थापन करण्याचा उद्देश पुरुषांच्या समस्यांना महत्त्व देणे हा होता. ज्याकडे, समाजात कमी लक्ष दिले जाते.
 
  
gift 2
 
 
समाजातील पुरूषांनी International Men's Day आपल्या कुटुंबाचा मुख्य आर्थिक आधार असावा तसेच आपल्या वैयक्तिक भावना नेहमी नियंत्रणात ठेवाव्यात अशी अपेक्षा असते. यामुळे, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना वडील, भाऊ व पती त्यांच्या मनातील अनेक स्वप्ने, इच्छा दडपून टाकतात. अशा परिस्थितीत हा दिवस तुमच्या वडिलांसाठी, भावासाठी किंवा पतीसाठी खास बनवण्यासाठी तुम्ही त्यांना या दिवशी खास गिफ्ट देऊ शकता. .
गिफ्ट कार्ड
तुम्ही तुमच्या International Men's Day सुपरहिरो बाबा, भाऊ किंवा नवऱ्याला भेटकार्ड भेट देऊ शकता. यासाठी,तुम्ही बाजारातून एखादे कार्ड खरेदी करू शकता किंवा घरी त्यांच्यासाठी खास कार्ड बनवू शकता तसेच त्यांच्या स्तुतीसाठी काही ओळी लिहू शकता. त्यावर, तुम्ही तुमचे आणि त्यांचे फोटोही टाकू शकता.
फिटनेस गॅझेट्स
फिटनेस गॅझेट International Men's Day भेट देणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. अशा परिस्थितीत तुम्ही स्मार्ट घड्याळ किंवा बँड भेट देऊ शकता. यामध्ये, तुम्हाला स्टेप काउंट, कॅलेंडर, बीपी मॉनिटर, कंपास, कॅलरी काउंटर, अलार्म क्लॉक व कॉल या सारखे अनेक फीचर्स मिळतील. खासकरून जर तुमचा भाऊ किंवा पती फिटनेसबाबत खूप जागरूक असेल. त्यामुळे, त्यांना गिफ्ट करण्याचा हा सर्वोत्तम पर्याय आहे.
एकत्र वेळ घालवा
आंतरराष्ट्रीय पुरुष International Men's Day दिन खास बनवण्यासाठी, तुमच्या वडिलांसोबत किंवा पतीसोबत वेळ घालवा. तुम्ही बाबा, भाऊ आणि नवऱ्यासाठी सर्व मिळून पार्टी आयोजित करू शकता. याशिवाय, तुम्ही तुमच्या सुपरमॅनसोबत सहलीची योजना आखू शकता. जसे, तुम्ही वीकेंडला कुटुंब किंवा पतीसोबत २ ते ३ दिवसांच्या सहलीची योजना करू शकता.
Powered By Sangraha 9.0