बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्यास अण्वस्त्रहल्ला

19 Nov 2024 20:08:54
- व्लादिमिर पुतिन यांचा इशारा
- बदलले अणुहल्ल्याचे नियम
 
मॉस्को, 
अणुशक्ती असलेल्या देशाच्या पाठिंब्यावर एखाद्या अणुशक्ती नसलेल्या देशाने हल्ला केल्यास रशिया त्याला युद्धाची घोषणा समजेल. रशियाच्या विरोधात बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा वापर झाल्यास, त्याला अण्वस्त्रहल्ल्याने उत्तर दिले जाईल, इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष Vladimir Putin व्लादिमिर पुतिन यांनी दिला. युक्रेनला पाठिंबा देणार्‍या देशांनी हल्ला करू नये, यासाठी पुतिन यांनी रशियाच्या अणुहल्ल्याच्या नियमांतही बदल केला आहे. अमेरिका आणि कित्येक युरोपियन देशांनी अलिकडेच युक्रेनला लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर पुतिन यांनी हे पाऊल उचलले.
 
 
Vladimir Putin
 
कोणत्याही देशाने रशियावर ड्रोनहल्ला केल्यास, अणुहल्ल्याने प्रत्युत्तर दिले जाऊ शकते. रशियाचे सैन्य याचे जोरदार उत्तर देईल. रशियाची सीमा पार करून कोणतेही अस्त्र हवा किंवा अंतराळातून आल्यास, रशिया त्याला युद्ध समजेल. अशा परिस्थिती रशिया अण्वस्त्रांचा वापर करू शकतो, असे Vladimir Putin पुतिन यांनी म्हटले आहे. देश आणि नागरिकांना धोका असल्याचे रशियाला वाटल्यास शत्रूला सडेतोड उत्तर देण्यासाठी तो आणि क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा तैनात करू शकतो. अंतराळातील हल्ल्याच्या स्थितीत रशिया आपली हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित करेल सोबतच अंतराळातूनही हल्ला केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत अण्वस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो.
Powered By Sangraha 9.0