यवतमाळ बाजार समितीत १६८ क्विंटलची खरेदी

    दिनांक :19-Nov-2024
Total Views |
यवतमाळ :
soybeans price : दीर्घ प्रतीक्षेनंतर सोयाबीनच्या शासकीय खरेदीला यवतमाळ बाजार समितीत प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी ४९८२ रुपये क्विंटलचा दर मिळाला असून, १६८ क्विंटलची खरेदी करण्यात आली. केंद्र शासनाने सोयाबीनचे हमीदर जाहीर केले. खुल्या बाजाराच्या तुलनेत हे दर अधिक आहे. यामुळे शेतकऱ्यांचा कल या हमी केंद्राकडे आहे. जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन सोयाबीन खरेदी करण्यापूर्वी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे, अशी माहिती व्यवस्थापक राजेश मॅडमवार यांनी दिली.
 
 
soybeans
 
soybeans price : विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सोयाबीनची हमी दरात खरेदी होणार होती. या खरेदीला परवानगी देण्यात आली. मात्र, सोयाबीनमध्ये अधिक ओलावा असल्याने ही खरेदी लांबणीवर पडली होती. बाजार समितीत प्रारंभी सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंद करावी लागणार आहे. यानंतर ओलावा तपासून सोयाबीनची खरेदी होणार आहे. १२ टक्क्यांपर्यंत ओलावा असणारे सोयाबीन खरेदी केंद्रावर खरेदी होणार आहे. सोयाबीनची आद्रता शेतकऱ्यांनी तपासल्यानंतरच असे सोयाबीन विक्रीसाठी आणता येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना ओलावा तपासावा लागेल, अशी माहिती देण्यात आली आहे.