निवडणुकीच्या परीक्षेत आम्ही उत्तीर्ण होऊ : मुनगंटीवार

Chandrapur-Mungantiwar सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

    दिनांक :20-Nov-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
 
 
चंद्रपूर, 
 
 
Chandrapur-Mungantiwar राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दुपारी सहकुटुंब चंद्रपुरातील सिटी हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी पत्नी सपना मुनगंटीवार, जावई डॉ. तन्मय बिडवई, मुलगी डॉ. शलाका मुनगंटीवार-बिडवई हेही उपस्थित होते. Chandrapur-Mungantiwar राज्यात बुधवारी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूकीसाठी मतदान झाले. यावेळी सुधीर मुनगंटीवार हेदेखील लोकशाहीच्या या उत्सवात सहकुटुंब सहभागी झाले. महायुती सरकारने गोरगरिबांची सेवा केली. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, युवकांच्या हाताला रोजगारावर भर दिला.
 
 
 
 
Chandrapur-Mungantiwar
 
 
 
Chandrapur-Mungantiwar त्यामुळे निवडणुकीत भाजप-महायुती रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास त्यांनी मतदानानंतर चंद्रपुरातील सिटी हायस्कूलमध्ये व्यक्त केला. मतदान हा लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव आहे. मतदान करणे आपला अधिकार असून, त्याचा वापर लोकशाही बळकट करण्यासाठी करा. मी सहकुटुंब मतदान केले आहे. जनतेला माझं आवाहन आहे की, आपण सर्वांनी मतदान करावे. Chandrapur-Mungantiwar सगळ्यांनी मतदानासाठी घराबाहेर पडलं पाहीजे, असे आवाहन त्यांनी केले. देशगौरव, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला ‘विकसित भारत’ करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी जनतेने मतदानाच्या रुपाने आहुती द्यायला हवी. जास्तीत जास्त प्रमाणात मतदान झाले पाहिजे. विधानसभा निवडणुकीच्या परीक्षेत आम्ही नक्कीच उत्तीर्ण होऊ, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.