तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
Chimur-BJP-Congress चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात बुधवारी भाजप-काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यामुळे काही काळ तेथे तणाव होता. जिल्हा परिषद कन्या शाळा, आझाद वॉर्ड नेहरू वॉर्डचे बुथवर हा तणाव हाोता. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपाने हा वाद मिटविण्यात आला आहे. Chimur-BJP-Congress विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली असून, याठिकाणी प्रशासनासह उमेदवारांचे कार्यकर्तेदेखील फिरत आहेत. सकाळी 9 च्या सुमारास आ. बंटी भांगडिया, माजी आमदार मितेश भांगडिया हे याठिकाणी कार्यकर्त्यांसह आले.
Chimur-BJP-Congress तर जिल्हा परिषदचे माजी सदस्य गजानन बुटके हेही आपल्या काँग्रेसच्या मंडपाजवळ पोहचले. त्यांच्यासोबत बॉऊन्सर्स होते. आ. भांगडिया यांनी आक्षेप घेत बॉऊन्सर्सना जाण्यास सांगितले. त्यामुळे केंद्राबाहेर बाचाबाची सुरू झाली. यानंतर घोषणासुद्धा देण्यात आल्या. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. Chimur-BJP-Congress त्यानंतर भाजप व काँग्रेसच्य कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन घोषणाबाजी सुरु झाल्यानंतर मतदान केंद्रावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून तणाव शांत केला. हे सर्व मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात घडले आहे.