गोंदिया,
Gondia-2 D Echo राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातंर्गत 16 व 17 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम पथकाद्वारे तपासणी दरम्यान निघालेले संशयीत हृदय रुग्ण मुलांची 2 डी ईको तपासणी उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी केले. Gondia-2 D Echo यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तृप्ती कटरे, डॉ. भारती जायस्वाल, उपजिल्हा रुग्णालय तिरोडाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहूल शेंडे यांच्यासह रुग्णालयाचे कर्मचारी, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे कर्मचारी उपस्थित होते.
2 डी इको तपासणी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय वर्धा येथील डॉ. शंतनू गोमासे यांनी केली. Gondia-2 D Echo यावेळी समन्वयक प्रतिक गडकरी उपस्थित होते. शिबिरामध्ये 64 बालकांची तपासणी करण्यात आली. यातील 21 जणांवर शस्त्रक्रिया होणार आहे. 16 लाभार्थी फालोअपमध्ये आहेत. तसेच 7 लाभार्थ्यांना औषधोपचार करुन समुपदेशन करण्यात आले. 20 लाभार्थी सर्वसाधारण आढळल्याची माहिती राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक संजय बिसेन यांनी दिली. Gondia-2 D Echo