- आ.कृष्णा खोपडे यांचा विश्वास
नागपूर,
पूर्व नागपुरातील मतदारांचा कौल विकास कामांना असल्यामुळे चौथ्यांदा जनतेची सेवा करण्याची संधी मिळेल, असा विश्वास भाजपचे पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार Krishna Khopde कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केला. पूर्व नागपुरातून चौथ्यांदा सामना करीत असताना जनतेची भक्कम साथ मिळाल्यामुळे अनेक विकास कामे करता आली. भांडेवाडीच्या रिकाम्या जागेवर जागतिक मान्यतेचे सिम्बायोसिस विद्यापीठ आणले. साडेचारशे कोटींची गुंतवणूक करून हा प्रकल्प उभारण्यात आल्यामुळे स्थानिक युवकांना मुंबई पुण्यात जाण्याची गरज राहिली नाही. आता उच्च शिक्षणाची सोय नागपुरातच झाल्यामुळे शिक्षणाचा खर्च कमी झाला आहे. आगामी काळात परिसराच्या बाजुलाच ५० एकर जागेवर नरसी मोनजी ही प्रतिष्ठित शिक्षण संस्था येत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या प्रयत्नामुळेच नागपूर शहराचा चेहरा मोहरा पूर्णत: बदललेला आहे. पूर्व नागपूरातील मतदारसंघात विकासाचे मॉडेल यशस्वी ठरले आहे. त्यामुळेच आपणास पूर्व नागपुरातून तीन वेळा जनतेची सेवा केल्यानंतर आता चौथ्यांदा निवडून येण्याचा विश्वास आहे. पूर्व मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे Krishna Khopde खोपडे यांनी सांगितले. महायुतीच्या सरकारने राज्यात विक्रमी कामे करुन दाखविली आहे. तर महाविकास आघाडीच्या दिशाभूल करणार्या योजनेमुळे मतदारांचा संताप कायम आहे. भाजपच्या चौफेर विकास कामांवर मतदार खुश असल्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास खोपडे यांनी व्यक्त केला.