विधानसभा निवडणुकीत सरासरी ६३ टक्के मतदान

*तरुण-तरुणी महिला वयोवृद्ध ज्येष्ठ मतदारात उत्साह *दिव्यांगांसाठी व्हील चेअर ची सुविधा *मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली

    दिनांक :20-Nov-2024
Total Views |
बुलढाणा,
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा लोकशाही उत्सव साजरा करताना मतदान केंद्रावर दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता पासून मतदारांनी मतदानाला प्रारंभ केला नव मतदार तरुण-तरुणी महिला वयोवृद्ध जेष्ठ व दिव्यांग मतदारांनी स्वयं स्फूर्तीने मतदानाचा हक्क बजावला काही मतदान केंद्रावर मतदान मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाला परंतु लगेच मशीन दुरुस्त करण्यात आल्या तसेच केंद्रावर सकाळपासून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुपारपर्यंत भोजन व्यवस्था नसल्याचा मौखिक तक्रारी झाल्यात.
 
 
ELECTION
 
 
 
सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदार संघनिहाय मतदारांची संख्या व झालेले मतदान पुढील प्रमाणे आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार संख्या २ लाख ८३ हजार ८५ झालेले मतदान पुरुष ९० हजार २८१ महिला ८७ हजार ५४१ एकूण १ लाख ७७ हजार ८२७ (५७.९० टक्के), चिखली विधानसभा मतदार संख्या ३ लाख ७ हजार १०६ मतदान पुरुष ९३ हजार ७९८ महिला ९६ हजार ५९३ एकूण मतदान १ लाख ९० हजार ३९१ (६२.२८), सिंदखेडराजा एकूण मतदार ३ लाख २२ हजार ९९५ मतदान पुरुष १ लाख २ हजार ४६३ महिला ९९ हजार ५९३ (६२.५६), मेहकर विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार ३ लाख ५ हजार ९६० मतदान पुरुष १ लाख १६ हजार ७९ महिला ९६ हजार ४६१ ( ६४.७५) मतदान झाले आहे. दिवसभर विविध मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला होता.