अर्जुनी मोरगाव,
Maharashtra Assembly Elections : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांची मुलगी श्रृती बडोले ही वडीलांना मतदान करण्यासाठी थेट लंडनवरुन सडक अर्जुनीला पोहचली व सहकुटूंब सडक अर्जुनी येथील मतदान केंद्र क्र.132 मध्ये मतदान केले.
अर्जुनी मोरगाव विधानसभेची निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. भाजपा,राष्ट्रवादी कांग्रेस अजीत पवार गट, व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून माजीमंत्री राजकुमार बडोले हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांची मुलगी श्रृती ही लंडनमध्ये उच्चपदस्थ नोकरी करते. तर एक मुलगा स्वप्नील बडोले हा सुध्दा बंगरुळ येथे उच्चपदावर नोकरीला असून दुसरा मुलगा अनिकेत बडोले हा नागपूर येथे नोकरी करीत आहे. आपले वडील निवडणुकीत निवडून यावे, यासाठी श्रृती थेट लंडनवरुन, स्वप्नील बंगरुळवरुन व अनिकेत नागपूर येथून आज 20 नोव्हेंबरला मतदानासाठी सडक अर्जुनीला पोहोचले व संपूर्ण बडोले कुटूबीयांनी मतदान केले.