तुफान गाेंधळ...काँग्रेस-भाजपा कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडीओ

20 Nov 2024 20:40:09
नागपूर,
Maharashtra Assembly Elections : विधानसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण हाेऊन अवघे काही तास उलटत नाहीत ताेच, नागपुरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी घटना घडली आहे. निवडणुकीतील स्पर्धा वैयक्तिक आणि परस्पर गैरसमजाची हाेत असल्याचे दाखविणारी घटना थाेड्या वेळापूर्वी नागपुरात घडली आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रवीण दटके यांना धक्काबुक्की करीत, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाेबत बाचाबाची केली आहे.
 

nagpur  
 
 
मध्य नागपूर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार प्रवीण दटके आणि त्यांच्या विराेधात काँग्रेसकडून बंटी शेळके निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सायंकाळी 7 च्या सुमारास, शिशु विकास प्राथमिक शाळेतून डमी ईव्हीएम नेण्यात येत हाेत्या. हा ईव्हीएमचा गैरवापर असल्याच्या संशयावरून काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएमची गाडी थांबवली. या मुद्यावरून काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते भिडले. कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला, शाब्दीक चकमक झाली आणि धक्काबुक्कीही झाली.
 
 
इथे बघा व्हिडीओ: नागपुरात तूफान राडा...काँग्रेस-भाजपा कार्यकर्ते भिडले!
 
 
या घटनेचे व्हिडीओ स्थानिकांनी माेबाईमध्ये कैद केला असून, ते व्हिडीओज व्हायरल झाले आहेत. दरम्यान, पाेलिसांचा ताा घटनास्थळी दाखल झाला असून, त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. यासाठी साैम्य बळाचा वापर त्यांनी केल्याचीही प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी, पाेलिस काय कारवाई करणार? याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे. याआधी, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या राेड शाेच्या दरम्यानही दाेन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली हाेती.
Powered By Sangraha 9.0