बोटाची शाई दाखवत 25 जणांनी 50 टक्क्यात केली दाढी कटींग

*वर्धेतील बॉम्बे बडिझ सलोनचा उपक्रम

    दिनांक :20-Nov-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
वर्धा,
Maharashtra Assembly Elections : लोकशाहीच्या उत्सवात आपलाही सहभाग असावा याकडे काही लोकांचा कल वाढतो आहे. मतदानाची टक्केवारी कमी होणे ही दुबळ्या लोकशाहीचा परिचय आहे. मतदान करण्याचे प्रलोभन नव्हे पण मतदान केल्याचे प्रोत्साहन म्हणून बोटाला मतदान केल्याची शाई दाखवा आणि दाढी कटींगवर 50 टक्के सवलत मिळवा, असे आवाहन येथील बॉम्बे बडिझ सलोन लिलाधर येऊलकर यांनी काल 19 रोजी केले होते. तरुण भारतने पोर्टलवर या वृत्ताला व्यापक प्रसिद्धी मिळाल्यानंतर सायंकाळपर्यंत 25 जणांनी 50 टक्के सवलतीत कटींग व दाढी केली.
 
 
wardha
 
 
वडिलोपार्जीत कटिंगचा व्यवसाय असुन वडिलांनी सुरू केलेले एक दुकान आपण वर्धेत चार केले यानिमित्ताने किमान 50 तरुणांना
रोजगार दिला. यावेळी आमची कसोटी होती. मालगुजारीपुर्‍यात असलेल्या आपल्या दुकानात प्रथमच माझे चारही ग्राहक निवडणुकीत आहेत. भाजपाचे उमेदवार डॉ. पंकज भोयर, काँग्रेसचे शेखर शेेंडे, अपक्ष डॉ. सचिन पावडे आणि रविंद्र कोटंबकर कटिंगसाठी येतात. चौघांचेही आमच्यावर प्रेम आहे. यापैकी एक कोणीतरी आमदार होणार आहे. परंतु, त्यासाठी आपल्या वर्धेतून 100 टक्के मतदानाची सुरुवात व्हावी यासाठी आम्ही स्वत: प्रयत्न करीत आहोत. आपण 20 रोजी सकाळी 10 ते 21 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत दाढी कटींगमध्ये सवलत देणार असल्याचे लिलाधर यांनी यांनी सांगितले. फक्त मतदान केल्याची शाई दाखवावी, असा आग्रह असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
मतदान हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. सरकारकडून सोयी सुविधांची अपेक्षा केली जाते. परंतु, मतदानाच्या वेळी रांगेत लागताना उन्ह लागतं, अनेकांना वैयक्तिक कामंही असतात. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरतो. लोकशाही प्रबळ करण्यासाठी संविधानाने दिलेल्या हक्काची अंमलबजावणी व्हावी यासाटी आम्ही हा उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
तंदूरमध्ये जेवनही
 
 
लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला. हे लोकशाही धोक्यात येण्याची पहिली घंटा आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्याने अनेक परिवार आऊटींगला जातात. त्यामुळे वर्धेैंतच मतदान करा आणि तंदूरमध्ये 10 टक्के सवलतीत सह परिवार जेवन करा, त्यासाठी मतदान केल्याचा पुरावा म्हणून शाईचे बोट दाखवावे लागेल असे हॉटल तंदूरचे संचालक मंदार अभ्यंकर यांनी सांगितले.