तभा वृत्तसेवा
देवळी,
Maharashtra Assembly Elections : 21 महाराष्ट्र एनसीसी बटालियन अंतर्गत स्थानिक एस. एस. एन. जे. महाविद्यालयातील छात्र सैनिकांनी विधानसभा निवडणूक क्षेत्रातील देवळी शहर मतदार केंद्रावर ‘मतदार स्वयंसेवक’ आपले कर्तव्य बजावले. या सेवांतर्गत पोलिस व होमगार्ड यांना मतदारांच्या रांगा लावण्याकरिता मदत करणे तसेच अपंग व वृद्ध मतदारांना मतदान कक्षापर्यंत पोहोचवून प्रशंसनीय कार्य केले.
एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा प्रकल्प राबविला असून यात अंडर ऑफिसर आदर्श नाईक, सार्जंट मनोज नेहारे, हरीओम ऊईके, गिरीधर नेहारे, तेजस धोटे, सुजल पराते, रितेश बुटे व एनसीसी छात्र सैनिकांचा समावेश होता. सदर सेवा कार्याबद्दल त्यांचे कमान ऑफिसर कर्नल समीक घोष व प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल नवनीत थापा यांनी कौतुक केले.