गृह मतदानातून डावलले! 102 वर्षांचे आजोबा तावात पोहोचले केंद्रावर

    दिनांक :20-Nov-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
गिरड, 
Maharashtra Assembly Elections : मतदान प्रक्रिया शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी वयोवृद्ध व्यक्तींना घरूनच मतदान प्रक्रिया पार पाडता यावी यासाठी निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रिया कार्यान्वित केली. मात्र समुद्रपूर तालुक्यातील शिवणफळ येथे कर्मचार्‍याने घरगुती मतदान प्रक्रियेचा अर्ज भरून घेतला नसल्याने 102 वर्षीय आजोबांना मतदान केंद्र गाठून मतदानाचा हक्क बजवावा लागला.
 

wardha 
 
 
शिवणफळ येथे 4 मतदार वयोवृद्ध असल्याने यांचे मतदान घरून घ्यायचे होते. तशी यादी निवडणूक आयोगाने या गावासाठी नेमलेल्या संबंधीत कर्मचार्‍याकडे पाठवली. गृह मतदान मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश असताना कर्मचार्‍याने केलेल्या दुर्लक्षाने आजोबांना मतदानापासुन वंचित रहावे लागले.
 
 
शामराव शिंदे (102) यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचावे लागले. त्यामुळे बी. एल. ओ. विरुद्ध निवडणूक अधिकार्‍यांकडे तक्रार करण्यात आली आहे.