वर्धा जिल्ह्यात सरासरी 67 टक्के मतदान

    दिनांक :20-Nov-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
Maharashtra Assembly Elections : दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणुकांचे फटाके फुटले. एकद दुसरा इच्छूक उमेदवार सोडले तर जवळपास ठरलेल्या उमेदवारांच तिकीट मिळाले. वर्धेतील तिहेरी तर देवळी, आर्वी आणि हिंगणघाट मतदार संघात दुहेरी लढत झाली. आज सकाळपासुन मतदारांमध्ये उत्साह होता. दुपारी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यात 63.50 टक्के मतदान झाले. 6 वाजेपर्यंत 67 टक्के सरासरी मतदान होण्याची शक्यता आहे.
 
 
wardha
 
 
 
आर्वी मतदार संघात 2 लाख 65 हजार 420 मतदार असून यामध्ये 1 लाख 33 हजार 598 पुरुष तर 1 लाख 31 हजार 820 महिला असून 2 इतर मतदार आहेत. यापैकी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 87 हजार 48 पुरुष (65.16 टक्के), 83 हजार 395 स्त्री मतदारांनी (63.26 टक्के) असे 1 लाख 70 हजार 443 (64.22 टक्के) मतदारांनी मतदान केले.
 
 
देवळीत 2 लाख 74 हजार 608 मतदार असून यामध्ये 1 लाख 38 हजार 538 पुरुष तर 1 लाख 36 हजार 70 महिला आहे. यापैकी 87 हजार 254 पुरुषांनी (62.98 टक्के), 85 हजार 238 स्त्री मतदारांनी (62.64 टक्के) असे 1 लाख 72 हजार 492(62.81 टक्के) मतदारांनी मतदान केले.
 
 
हिंगणघाटात 2 लाख 97 हजार 547 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 51 हजार 538 पुरुष तर 1 लाख 46 हजार 9 महिला मतदार आहेत. 1 लाख 666 पुरुष मतदारांनी (66.43 टक्के), 94 हजार 605 स्त्री मतदारांनी (64.79 टक्के) असे 1 लाख 95 हजार 271 (65.63 टक्के) मतदारांनी मतदान केले.
 
 
वर्धा मतदार संघात 2 लाख 94 हजार 751 मतदार असून यामध्ये 1 लाख 47 हजार 411 पुरुष तर 1 लाख 47 हजार 329 महिला असुन 11 इतर मतदार आहे. 91 हजार 757 पुरुष मतदारांनी (62.25 टक्के), 88 हजार 994 स्त्री मतदारांनी (60.40 टक्के) तर इतर 8 मतदारांनी (72.73 टक्के) असे 1 लाख 80 हजार 759 (61.33 टक्के) मतदारांनी मतदान केले. चारही विधानसभा मतदार संघातील 1342 मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
 
 
मतदान केंद्राच्या 50 टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टींग यशस्वीरीत्या करण्यात आले.या सगळ्या घडमोडीवर जिल्हाधिकारी दिवसभर नजर ठेऊ होते. गेल्या दोन दिवसांपासुन विविध सामाजिक संघटनांच्या वतीने 100 टक्के मतदान व्हावे यासाठी नियोजन करण्यात आले. आज सकाळपासुनही व्हॉट्सअ‍ॅपवरूनही मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले.
 
 
वर्धा विधानसभा मतदार संघात भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. पंकज भोयर, काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार शेखर शेंडे, अपक्ष डॉ. सचिन पावडे अशी तिहेरी लढत झाली. देवळीत भाजपाचे राजेश बकाने विरुद्ध काँग्रेसचे आ. रणजित कांबळे यांच्यात काट्याची टक्कर झाली. आर्वीत भाजपाचे सुमित वानखेड आणि राकाँ शरद पवार गटाच्या उमेदवार मयूरा काळे यांच्यात हिंगणघाट येथे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली. रात्री 10 वाजेपर्यंत अंतिम आकडेवारी हाती येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.
 
 
हिंगणघाटात उशिरा मतदान
 
 
हिंगणघाट विधानसभा मतदार संघातील स्थानिक गौतम वार्ड समाज मंदिर येथील मतदान केंद्र 220 येथे 40 मिनिटं उशिराने मतदान सुरू झाल्याने गोंधळ उडाला. ईव्हीएमच्या तांत्रिक बिघाडामुळे या केंद्रावर मतदान थेट 40 मिनिटांनी उशिरा सुरू करण्यात आले.