671 केंद्रांचे झाले वेब कास्टिंग

20 Nov 2024 20:50:10
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
Maharashtra Assembly Elections : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष मतदानासाठी संपूर्ण तयारी प्रशासनाने पूर्ण केली होती. जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघात बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील 1 हजार 342 मतदान केंद्रांवरून मतदान झाले. तर निवडणूक आयोगाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन 50 टक्के मतदान केंद्र म्हणजेच जिल्ह्यातील 671 मतदान केंद्रांचे मतदानाच्या दिवशी वेब कास्टिंग झाले.
 
 
web casting
 
 
वर्धा विधानसभा मतदारसंघात 16 उमेदवार रिंगणात उभे आहे. या मतदारसंघात 346 मतदान केंद्रांवरून मतदान पार पडले. त्यापैकी 173 मतदान केंद्रांचे वेब कास्टिंग झाले. आर्वी मतदारसंघात 18 उमेदवार निवडणूक लढत आहेत. आर्वी मतदार संघात 310 मतदान केंद्रांवरून मतदान झाले. त्यापैकी 155 मतदान केंद्रांचे वेब कास्टिंग झाले. देवळी विधानसभा मतदार संघात 14 उमदेवार राजकीय भवितव्य आजमावत असून या मतदार संघात 335 मतदान केंद्रावरून मतदान झाले. त्यापैकी 168 मतदान केंद्रांचे वेब कास्टिंग झाले. हिंगणघाट मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात 12 उमेदवार असून या मतदार संघात 351 मतदान केंद्रांवरून मतदान झाले. त्यापैकी 176 मतदान केंद्रांचे वेब कास्टिंग करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0