- उत्तरप्रदेशात पोटनिवडणुकीला गालबोट
मुझफ्फरनगर,
बुधवारी झालेल्या संघर्षानंतर Mirapur Assembly By-Election मीरापूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान काक्रोळी गावात दोन गटांनी एकमेकांवर दगडफेक केली, असे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) अभिषेक सिंह यांनी पत्रकारांना सांगितले की, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि सौम्य बळाचा वापर करून जमावाला पांगवले. परिस्थिती नियंत्रणात असून, मतदान शांततेत सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. मीरापूर येथे सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५७.०२ टक्के मतदान झाले.
पोलिस लोकांना घराबाहेर पडू देत नव्हते, काक्रोळी भागात मतदानाची टक्केवारी कमी होती, असे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिनचे (एआयएमआयएम) उमेदवार मोहम्मद अर्शद यांनी सांगितले. पोलिस मतदारांना त्रास देत आहेत आणि त्यांना घराबाहेर पडू देत नाहीत. लोकशाहीच्या या उत्सवात ते लोकांचे शत्रू असल्यासारखे वागत आहेत, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
Mirapur Assembly By-Election समाजवादी पक्षाचे उमेदवार सुंबूल राणा यांनीही पोलिस मतदारांचा करत असल्याचा आरोप केला. राष्ट्रीय लोक दलाच्या उमेदवार मिथलेश पाल यांनी पत्रकारांना सांगितले की, मीरापूर मतदारसंघाबाहेरील लोकांना बोगस मतदान करण्यासाठी बोलावले जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. या लोकांना मदरसा आणि शाळांमध्ये सामावून घेण्यात आले. बुरखा घातलेल्या महिलांकडून बोगस मतदान होत असल्याचा दावाही पाल यांनी केला.
सात पोलिस निलंबित
मतदान करण्यापासून रोखणार्या आणि कर्तव्यात हयगय करणार्या पोलिस कर्मचार्यांना निलंबित करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला. कानपूर आणि मुझफ्फरनगरमध्ये प्रत्येकी दोन आणि मुरादाबादमध्ये एका पोलिस कर्मचार्याला निलंबित करण्यात आले. तिघांना मुरादाबादमधील कर्तव्यावरून हटवण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी उत्तरप्रदेशच्या निवडणूक अधिकार्यांना मतदान प्रकि‘या निष्पक्ष आणि सुरळीत पार पाडण्याचा निर्देश दिला.