दोषींना शिक्षा होतपर्यंत शांत बसणार नाही

    दिनांक :20-Nov-2024
Total Views |
- मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचा इशारा
 
इम्फाळ, 
गेल्या आठवड्यात संशयित कुकी बंडखोरांनी केलेल्या सहा जणांच्या हत्येबद्दल मणिपूरचे मुख्यमंत्री N. Biren Singh  बिरेन सिंह यांनी दु:ख व्यक्त केले आणि दोषींना शिक्षा होतपर्यंत त्यांचे सरकार शांत बसणार नाही, असे सांगितले. गेल्या आठवड्यात जिरिबाम जिल्ह्यातील एका नदीत तीन महिला आणि तीन मुलांचे मृतदेह सापडले होते. महिला आणि मुलांची हत्या हा मानवतेविरुद्धचा गुन्हा असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी रात्री ‘एक्स’वर शेअर केलेल्या व्हिडीओ संदेशात आहे की, जिरिबाम येथे ओलिस बनवल्यानंतर कुकी बंडखोरांनी तीन निष्पाप मुले आणि तीन महिलांच्या झालेल्या भीषण हत्येचा निषेध करण्यासाठी आज मी अत्यंत दुःखावेगाने उभा आहे.
 
 
Biren Singh
 
अशा क्रूर कृत्यांना कोणत्याही सुसंस्कृत समाजात स्थान नाही. दहशतवाद्यांचा शोध सध्या सुरू आहे आणि त्यांना लवकरच न्यायाच्या कठड्यात आणले जाईल. जोपर्यंत त्यांना शिक्षा होत तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे मुख्यमंत्री N. Biren Singh  म्हणाले. जिरिबाममधील विस्थापितांच्या छावणीतून ११ नोव्हेंबरपासून हे सहा लोक बेपत्ता होते. बंडखोर आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत १० बंडखोरांचा मृत्यू झाला होता. मुख्यमंत्र्यांनी जिरिबाममध्ये त्वरित कारवाई केल्याबद्दल सीआरपीएफचे आभार मानले आणि त्यांच्या कर्तव्याच्या वचनबद्धतेमुळे जिरिबाममधील बोरोबेकारा येथील मदत शिबिरांमध्ये राहणार्‍या शेकडो लोकांचे वाचल्याचे सांगितले.