- संरक्षण सहकार्यासह विविध मुद्यांवर चर्चा
नवी दिल्ली,
संरक्षण मंत्री Rajnath Singh राजनाथसिंह यांनी बुधवारी लाओसमधील व्हिएंटियाने येथे चीनचे संरक्षण मंत्री डोंग जून यांच्यासोबत चर्चा केली. संरक्षणमंत्र्यांच्या कार्यालयाने समाज माध्यमावर पोस्ट करून या बैठकीची माहिती दिली. यावेळी, लाओस, डीएमएम-प्लसचे वर्तमान अध्यक्ष म्हणून बैठकीचे आयोजन करीत आहे. लाओसच्या राजधानीत १० देशांच्या आसियान गटाच्या आणि काही संवाद भागीदारांच्या परिषदेत ही बैठक झाली.
लाओसमध्ये अकराव्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या डीएमएम-प्लस दरम्यान त्यांच्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान चीनचे संरक्षण मंत्री डोंग जून यांनी Rajnath Singh राजनाथसिंह यांचे स्वागत केले. या संभाषणाबाबत संरक्षण मंत्रालयाने ‘एक्स’वर पोस्ट केले की, राजनाथसिंह यांनी लाओ पीडीआर संरक्षण मंत्री जनरल चान्समोन चन्यालथ यांच्यासोबत व्हिएंटियानेमध्ये द्विपक्षीय बैठक घेतली. त्यांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या मार्गांवर तसेच प्रादेशिक सुरक्षेशी संबंधित मुद्यांवरही चर्चा केली. गेल्या महिन्याच्या अखेरीस भारत आणि सैन्याने डेमचोक आणि डेपसांगमधील सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. दोन्ही बाजूंनी जवळपास साडेचार वर्षांच्या कालावधीनंतर दोन्ही भागात पुन्हा गस्त सुरू केली.