निरोगी जीवनासाठी निसर्गोपचाराची नितांत गरज

20 Nov 2024 20:26:12
- संजीवन नॅचरोपॅथी केंद्रात राष्ट्रीय निसर्गोपचार दिवस
 
नागपूर,
विदर्भातील एकमेव Sanjivan Naturopathy Centre संजीवन निसर्गोपचार आणि योग केंद्रात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असून यामुळे अनेकांना लाभ झाला आहे. निसर्गोपचारामुळे अनेकांना लाभ झाला असून आपले आरोग्य ठणठणीत ठेवण्यासाठी प्रत्येकांनी निसर्गोपचाराकडे वळावे, असे आवाहन अ‍ॅड. गौरी चांद्रायण यांनी केले. संजीवन सोशिओ मेडिकल फाऊंडेशन संचालित संजीवन निसर्गोपचार आणि योग केंद्राच्या वतीने आमगाव (देवळी) हिंगणा येथे निसर्गोपचार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
 
 
Sanjivan we
 
Sanjivan Naturopathy Centre : राष्ट्रीय निसर्गोपचार दिनानिमित्त पाच दिवसीय निसर्गोपचार शिबिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात प्रामुख्याने मेडीकल कॉलेजचे माजी अधिष्ठाता डॉ. हरिभाऊ कानडे, आयुर्वेदाचार्य डॉ. कानडे, होमियोपॅथ डॉ. ज्योती नेत्ररोग तज्ञ डॉ. आकांक्षा अग्रवाल, पॅथालॉजिस्ट डॉ. सिध्दम आदी उपस्थित होते. आपली जीवनशैली निरोगी करण्यासाठी आवश्यक बदल आणि नैसर्गिक घरगुती उपचारांबाबत डॉ. मानधाता विश्वकर्मा यांनी मार्गदर्शन केले. संजीवन निसर्गोपचार केंद्रात गत दोन वर्षात ५ हजार ८०० व्यक्तींवर नॅचरोपॅथीचे उपचार केले गेले असून त्यांना व्याधीमुक्त करण्यात आल्याचे डॉ. उगेमुगे यांनी प्रास्ताविकात सांगितले. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे सचिव डॉ राजू मिश्रा, डॉ. राखी खेडीकर यांची विशेष उपस्थिती होती. डॉ. विश्वकर्मा यांनी आभार मानले. शिबिराला शिबिरार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Powered By Sangraha 9.0