-महिला मतदारांचा आनंद फुललेला
नागपूर,
South Nagpur Assembly Constituency : दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात बुधवारी उत्साहात मतदान झाले. मतदानास आलेल्या आणि मतदान करून बाहेर पडताना विशेषतः स्त्री मतदारांचा फुललेला आनंद उघडपणे दिसत होता. त्यांचे हेच आनंदी चेहरे ‘फुल खिल गया’चे संकेत देत होते. मात्र, काही ठिकाणी कर्मचारीच संथ असल्याचे आले.
बुधवारी सकाळी सात वाजता मतदान सुरू झाले. बिंझाणी महाविद्यालयाच्या बूथ क्रमांक ५३, ५४ वर सकाळपासूनच मतदारांंच्या रांगा होत्या. येथील खोली क्र. ११मध्ये मात्र कर्मचारी संथ होते. एक मतदार दुसर्या दारानेे आत आला. तेेथील नाव तसेच फोटो तपासण्याची जबाबदारी असलेला कर्मचारी त्या मतदाराचे नाव शोधत होता. त्यात बराच वेळ इतर तीन खोल्यात मात्र रांगा नव्हत्या.
South Nagpur Assembly Constituency : चंदननगरातील कामगार कल्याण केंद्र, हनुमान नगर महानगरपालिका शाळा, जुना सुभेदार ले- आऊटमधील महापालिका शाळा, भगवाननगरातील एसरा कॉन्वेंट, रिंगरोडवरील संजय गांधी हायस्कूल, जकाते हायस्कूल, महात्मा गांधी नगरातील संजय हायस्कुल, रामभाऊ म्हाळगी नगरातील महापालिका शाळा, आशीर्वाद नगरातील दादासाहेब ठाकरे हायस्कूल, बीडपेठमधील संजय गांधी स्मृती शाळा, नॅशनल हायस्कुल, सावित्रीबाई फुले उर्दु शाळा, ताजुद्दीनबाबा आयटीआय, ताज हायस्कुल आदींसह अनेक केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून आले.
सकाळच्या सत्रातच मतदान कसे उरकता येईल, यावरच नागरिकांचा भर दिसला. हनुमाननगर, दुर्गानगर, भगवाननगर, विश्वकर्मानगर, रामेश्वरी, ओंंकारनगर, अमरनगर, विठ्ठलनगर, जानकीनगर, बीडपेठ, आशीर्वादनगर, ताजबाग परिसरातील मतदान केंद्रावर मतदानासाठी येणार्या नागरिकांची संख्या लक्षणीय होती. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. दुपारच्या सत्रात मतदानासाठी येणार्यांची सं‘या काहीशी मंदावलेली दिसली. शिवाय मतदानाची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचे दिसून आले. ज्येष्ठ व दिव्यांगाना मतदान करता यावे म्हणून काही राजकीय पक्ष्याच्या वतीने ऑटो-रिक्षाची व्यवस्थाही केली होती. त्यासाठी प्रशासनातर्फे दिव्यांग रथ होता.
सर्वच मतदान केंद्रांबाहेर कार्यकर्ते सकाळी न्याहारी, दुपारी आस्वाद घेत होते. अनेक ठिकाणी नावे शोधण्पासाठी लॅपटॉपचा वापर दिसला. मतदार यादीतून व अॅपमधून नावे शोधून दिली जात होती. मुख्य म्हणजे मतदार यादीसंबंधी किरकोळ अपवाद वगळता तक्रार दिसली नाही. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मज्जाव असल्याचे ठळकपणे प्रदर्शित केले होते. पोलिसही तसे सांगत असल्याचे दिसले. दक्षिण नागपुरातील सर्वच केंद्रांवर पोलिस बाहेर गृहरक्षक तैनात होते. सर्वच केंद्रांवर मतदान संथ होत असल्याचे दिसून आले. बीडपेठमधील संजय स्मृती शाळेत दुपारी ३ वाजेपर्यंत ३०.७८ टक्के मतदान झाले होते.
South Nagpur Assembly Constituency : हनुमाननगरातील लालबहादूर शास्त्री महानगरपालिका केंद्रातील बूथवर, मतदान प्रक्रियेत महिला व पुरुष कर्मचार्यांचा समावेश होता. मतदारांसोबत सवर्र्च कर्मचार्यांची वागणूक सौजन्याची दिसली. मतदार प्रत्यक्ष मतदान करताना कुठेही दिसला नाही. भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार मोहन मते यांनी सी. पी. अॅण्ड बेरार महाविद्यालय, काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार गिरीश पांडव यांनी हनुमाननगरातील लालबहादूर शास्त्री महानगरपालिका केंद्रात मतदान केले. सर्वच उमेदवार नंतर मतदारसंघात दिवसभर फिरत होते.