स्पॅम कॉल्स, संदेशांच्या संख्येमध्ये मोठी घट

20 Nov 2024 20:49:22
- गेल्या तीन महिन्यांत १८ लाख क्रमांक ब्लॉक
 
नवी दिल्ली, 
Spam calls and messages : ‘प्रमोशनल व्हॉईस कॉल्स’बाबत नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याच्या तरतुदीमुळे स्पॅम कॉल्स आणि नको असलेल्या संदेशांच्या संख्येमध्ये मोठी घट झाली आहे. कठोर कायदे लागू केल्यानंतर ग्राहकांना स्पॅम किंवा नको असलेल्या कॉलपासून दिलासा मिळाल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) बुधवारी ही माहिती दिली आहे.
 
 
Spam calls
 
Spam calls and messages स्पॅम कॉल आणि संदेशांच्या समस्येला तोंड देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. ‘प्रमोशनल व्हॉईस कॉल’च्या नियमांचे उल्लंघन करताना आढळलेल्या कोणत्याही संस्थेची सर्व दूरसंचार संसाधने बंद केली जातील. अशा कंपन्यांना दोन वर्षांसाठी यादीत टाकले जाईल. एवढेच नाही तर त्यांच्यासाठी नवीन संसाधनांचे वाटपही या काळात थांबवले जाईल. केंद्र सरकारच्या या कठोर नियमानंतर स्पॅम कॉलच्या तक्रारींमध्ये मोठी घट दिसून आली.
 
 
Spam calls and messages : यावर्षी ऑगस्ट महिन्यात स्पॅम कॉलच्या विरोधात नोंदवलेल्या तक्रारींची संख्या १ लाख ८९ हजार होती, ती सप्टेंबर २०२४ मध्ये कमी होऊन १ लाख ६३ झाली. गेल्या तीन महिन्यांत किमान १८ लाख क्रमांक ब्लॉक करण्यात आले असून, ८०० हून अधिक कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात आल्याचा दावा ट्रायने केला आहे. सर्व व्यावसायिक कॉल १४० मालिका क्रमांकावरून केले जातील. ज्या लोकांनी ‘डू नॉट डायल’साठी (डीएनडी) नोंदणी केली आहे, त्यांना व्यावसायिक कॉल जाणार नाहीत. वैयक्तिक नंबरवरून स्पॅम किंवा संदेश पाठवणार्‍या कोणत्याही टेलि-मार्केटरला ते नंबर ब्लॉक केले जातील.
Powered By Sangraha 9.0