अमेरिकेने बंद केले कीव्ह येथील दूतावास

    दिनांक :20-Nov-2024
Total Views |
वॉशिंग्टन, 
US Embassy : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान हवाई हल्ल्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन अमेरिकेने कीव्ह येथील दूतावास बंद केले आहे. युक्रेनची राजधानी कीव्ह येथील अमेरिकेच्या दूतावासाला बुधवारी संभाव्य हवाई हल्ल्याबाबत माहिती मिळाली. यामुळे दूतावास बंद केले जाईल, अमेरिकेच्या स्टेट कॉन्सुलर अफेयर्स विभागाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले.
 
 
US Embassy
 
हवाई हल्ल्याचा अलर्ट जारी केल्यास अमेरिकी नागरिकांनी तत्काळ सुरक्षित ठिकाणी जावे, असे अमेरिकी दूतावासाने म्हटले आहे. युक्रेनने पश्चिमेकडील ब्रायन्स्क प्रदेशात अमेरिका निर्मित लांब पल्ल्याची एटीएसीएमएस ६ क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा रशियाने मंगळवारी केला होता. युक्रेन-रशिया युद्धाला एक हजार दिवस पूर्ण आहेत. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या सरकारने युक्रेनला रशियावर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याची परवानगी दिली आहे. या पृष्ठभूमीवर अमेरिकेने कीव्हमधील दूतावासाच्या सुरक्षेबाबत खबरदारी घेतली आहे.
 
 
US Embassy : रशियाने पश्चिमी देशांना इशारा दिला आहे की, जर अमेरिकेने युक्रेनला अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स निर्मित क्षेपणास्त्रे रशियामध्ये डागण्याची परवानगी दिली, तर रशिया देशांच्या सदस्यांना युक्रेनमधील युद्धात थेट सहभागी होण्याचा विचार करेल. रशियावर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ला झाल्यास रशिया प्रत्युत्तरात अण्वस्त्रांचा वापर करू शकतो, अशी तरतूद रशियाच्या नव्या अण्वस्त्र धोरणात आहे. यामुळे युद्ध भडकण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.