गोंदिया,
risky railway crossing रेल्वे क्रॉसिंगवर फाटक बंद असतानाही थोडा वेळ वाचविण्यासाठी अनेक जण फाटकाखालून दुचाकीसह ये-जा करतात, ही घाई जीवघेणी ठरु शकते. शिवाय असा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तिवर गुन्हाही दाखल होऊ शकतो. गोंदिया जिल्ह्यातून मध्य रेल्वे दक्षिण मध्य रेल्वेचा लोहमार्ग गेला आहे. risky railway crossing या लोहमार्गावर अनेक ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग आहेत. गोंदिया शहरातील हड्डीटोली, मरारटोली, मुर्री, आंबाटोली, सूर्याटोला या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग आहेत. या रेल्वे मार्गावर धावणार्या प्रवासी व मालगाड्यांची संख्या मोठी असल्याने दर पंधरा ते वीस मिनटाने रेल्वे फाटक बंद ठेवावे लागतात.
त्यामुळे या फाटकाच्या दोन्ही बाजुला नेहमीच वाहनांची मोठी कोंडी होते. अनेकदा काही उतावीळ दुचाकीस्वार, सायकलस्वार व नागरिक फाटकाखालून रुळ ओलांडतात. या प्रकाराने अपघातात होऊन जीव जाण्याची शक्यता राहते. तसेच असा प्रयत्न केल्यास गुन्हाही दाखल होऊ शकतो. मात्र. जिल्ह्यात हा प्रकार सर्रास सुरु असताना अद्याप एकही गुन्हा दाखल झाल्याचे दिसून येत नाही. risky railway crossing रेल्वे रुळ ओलांडणे हा दंडनीय अपरात असून भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम 147 अन्वये अशा व्यक्तीवर कारवाई केली जाऊ शकते. या अंतर्गत सहा महिन्यांचा कारावास किंवा 100 रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. याशिवाय भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम 159 अन्वये रेल्वे कर्मचार्यांच्या निर्देशांचे उल्लंघन करणार्याविरुद्ध कारवाई होऊ शकते.