‘बटेंगे तो कटेंगे’ वर राजकारण कशासाठी?

21 Nov 2024 05:50:00
दखल
- सोनाली मिश्रा
'Ek Hai To Seif Hai' : झारखंड आणि महाराष्ट्रासह अनेक जागांवरील पोटनिवडणुका २० नोव्हेंबर रोजी पार पडल्या. या दोन्ही प्रचारसभांमध्ये सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. राजकारणी मंडळींनी नवनवीन घोषणा, आश्वासने आणि उद्दिष्टांसह मतदारांचे दार ठोठावले. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या नार्‍याची बरीच चर्चा झाली. हा नारा मुस्लिमविरोधी असल्याची बडबड तथाकथित सेक्युलर मंडळींनी केली. या नार्‍यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याची नेहमीचीच ओरड काँग्रेसी नेते अन्य विरोधकांनी केली.
 
 
Ekta-1
 
वास्तविक ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेमध्ये कोणत्याही समाजाचे नाव नाही किंवा ही कोणाच्या विरोधातही ही घोषणा देण्यात आलेली नाही. मात्र काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष या घोषणेला फुटीर आणि हिंसक म्हणत आहेत. इंग्रजीत एक म्हण आहे -"United we Stand, divided we fall' अर्थात ‘आम्ही एकसंध राहिलो विजयी होऊ आणि विभाजित झालो तर आम्ही अपयशी होऊ.
त्याचप्रमाणे एकतेसंबंधी एक श्लोक आढळतो-
ऐक्यं बलं समाजस्य तदभावे स दुर्बल:|
तस्मात् ऐक्यं प्रशंसन्ति दृढं राष्ट्र हितैषिण: ॥
म्हणजेच एकता हीच समाजाची ताकद असते, एकताहीन अर्थात एकतेचा अभाव असलेला समाज दुर्बल असतो. त्यामुळेच राष्ट्रहिताचा विचार करणारे नेहमीच ऐक्याला प्रोत्साहन देतात. आपण हाच विचार आजच्या स्थानिक भाषेत मांडला किंवा दुसर्‍या शब्दात सांगायचे झाल्यास नेत्यांच्या भाषेत मांडला तर ते आपल्या मतदारांना आपला मुद्दा प्रभावीपणे समजावून सांगू शकतील आणि संवाद टिकवून ठेवू शकतील. ‘बटेंगे तो कटेंगे’ मधून हाच अर्थ प्रतिबिंबित होतो. अर्थात आपण विभाजित राहू तर सुरक्षित राहणार नाही. त्यामुळे आपल्याला एकीची आहे. ‘एकीचे बळ’ असेल तर आपण कायम सुरक्षित राहू. हेच या घोषणेतून बिंबवायचे आहे.
'Ek Hai To Seif Hai' : प्रत्येक कालखंडाची स्वत:ची एक भाषा असते आणि एक पुस्तकाची भाषा असते आणि दुसरी आणखी एक नैसर्गिक, सहज संवादाची भाषा असते. पण या मूलभूत एकतेच्या मुद्यावर विरोधक एवढा गदारोळ का माजवत आहेत? ‘बटेंगे तो कटेंगे’ या अशी कोणती फुटीरतावादी गोष्ट आहे? ज्यांचे राजकारण नेहमीच फुटीरतावादी/विभाजनवादी घोषणांवरच अवलबूंन आहे, त्यांना तर भाजपाच्या या घोषणेचे मर्म कधीच समजणार नाही.
कन्हैया कुमार हा सध्या काँग्रेसचा नेता आहे. कन्हैया कुमारला एकेकाळी तरुणांचा नेता म्हटले जायचे. पण कन्हैय्या कुमार कोणत्या घोषणांनी प्रसिद्धीच्या झोतात आला? याचा विचार कुणी गांभीर्याने केला आहे त्याच्या प्रत्यक्ष कार्यापेक्षा त्याने दिलेल्या घोषणांमुळेच तो प्रसिद्धीच्या झोतात आला. कन्हैया कुमार जेव्हा जेएनयूमध्ये विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होता तेव्हा कोणत्या घोषणांमुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता? अशा कोणत्या या घोषणा होत्या की ज्यांनी स्वातंत्र्यानंतर थेट भारताच्या आत्म्यावर हल्ला केला होता? हे अजूनही सुरूच आहे.
या घोषणा होत्या-
‘‘अफजल हम है, तेरे कातिल जिंदा है’,
‘तुम कितने अफजल मारोगे, हर घर से अफजल निकलेगा’’
आता अफझल कोण होता हे अधिक सविस्तरपणे सांगण्याची आवश्यकता नाही. ज्या घोषणांना काँग्रेस ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ म्हणते, त्या घोषणांमध्ये भारताचे तुकडे करण्याची गोष्ट होती. त्या घोषणा पुढीलप्रमाणे आहेत-
‘‘ भारत तेरे टुकडे होंगे- इंशाअल्लाह-इंशा अल्लाह’’
‘‘कश्मीर आजादी तक जंग रहेगी, जंग रहेगी’’
‘हम क्या चाहते, आजादी,’’
‘‘कश्मीर मांगे आजादी, केरल मांगे आजादी,
असम मांगे आजादी!’’
'Ek Hai To Seif Hai' : या घोषणा होत्या ज्यात भारताच्या फाळणीबाबत, विघटनाबद्दल स्पष्टपणे उल्लेख होता. आणि या घोषणा दुसरीकडे कुठे नाही तर तर देशातील सर्वांत प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था म्हणविण्यात येणार्‍या विद्यापीठात देण्यात आल्या होत्या. तोच कुमार सध्या काँग्रेसमध्ये आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य केवळ या घोषणांपुरतेच मर्यादित नव्हते. जेव्हा नागरिकत्व कायद्याविरोधात तथाकथित आंदोलन सुरू होते त्यावेळी फैज अहमद फैज यांची एक कविता (शायरी) अत्यंत क्रांतिकारी म्हणून गायली जात होती, ‘लाझीम है कि हम भी देखेंगे!’ पण या कवितेचे स्वरूप पूर्ण वाचल्यावरच कळू शकेल. यामध्ये मूर्तिभंजनाची चर्चा तर दुसरीकडे ‘खल्क-ए-खुदा’च्या राजवटीचीही इच्छा आहे. ती मजहबी (धार्मिक) असू शकते. पण भारतासारख्या संविधानाचे पालन करणार्‍या देशात, जिथे अनेक धर्माचे, पंथाचे व संप्रदायाचे लोक राहतात, तिथे मूर्ती पाडून कोणती क्रांती घडू शकते, हे समजण्यापलीकडचे आहे. आणि या आंदोलनाला कोणी पाठिंबा दिला हे देखील सर्वांना माहीत आहे.
या नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान काली माता हिजाबमध्ये दाखवण्यात आली होती. हे सर्व भडकवणारे आणि फूट पाडणारे नव्हते का? ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेला विभाजनवादी म्हणणारे लोक जेव्हा नूपुर शर्मा यांना ‘सर तन से जुदा’ ची धमकी देण्यात आली तेव्हा मात्र गप्प बसले होते. धर्मांध व जिहादी मुस्लिमांनी दिलेल्या या घोषणेला विरोध करण्याची ही घोषणा देणार्‍या मुल्ला-मौलवींना विरोध करण्याची हिंमत या सेक्युलर व अन्य काँग्रेसी नेत्यांनी दाखविली नव्हती.
'Ek Hai To Seif Hai' : भारतात संविधानापेक्षाही धार्मिक कट्टरता शक्तिशाली आहे का? त्यामुळेच हा प्रश्न वारंवार उद्भवतो. कारण वारंवार कोणत्या ना कोणत्या मुद्यावर कोणाच्या तरी विरोधात घोषणाबाजी केली जाते. भाजपाच्या माजी नेत्या नूपुर शर्मा हे त्याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. विरोधात जे वातावरण निर्माण करण्यात आले आणि ज्या प्रकारची घोषणाबाजी झाली, ती केवळ हृदय पिळवटून टाकणारी नव्हती तर त्यांचे वैयक्तिक आयुष्यही पूर्णपणे उद्ध्वस्त करणारी होती. आज ती सुरक्षेच्या घेर्‍यात आपले आयुष्य जगत आहे. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नारा देऊन ‘सर तन से जुदा’ घोषणोला विरोध न करणार्‍या लोकांसाठी नुपूर शर्माचे हा मुद्दाच नाही. उदयपूरचा शिंपी कन्हैयाच्या हत्येविषयी देखील असेच म्हणता येईल. मात्र, कन्हैयाच्या हत्येविषयी मूग गिळून बसलेले ‘बटेंगे तो कटेंगे’चा मुद्दा आवर्जून उपस्थित करतात, हा शुद्ध ढोंगीपणा आहे. वास्तविक ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ या घोषणेमुळे केवळ भारतविरोधी लोकांना संताप यायला हवा. प्रत्येक देशभक्ताला हे चांगलेच ठाऊक आहे की, आपापसातील मतभेदांमुळे विभाजित झालो तर ते बाहेरच्या लोकांच्या हल्ल्यांना बळी पडतील, शक्तिहीन होतील आणि शेवटी नष्ट होतील. म्हणूनच ‘एक है तो सेफ है’ हे राष्ट्रभक्त नागरिकांनी कायम लक्षात ठेवले पाहिजे.
(पांचजन्यवरून साभार)
Powered By Sangraha 9.0