विश्लेषण
- धर्मांतर आणि लैंगिक शोषणामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त
- ‘ऑनलाईन विश्वात’ सावधगिरी बाळगा
शिवम दीक्षित
'gaming jihad' : जिटल विश्वाने आजच्या आधुनिक काळात मनोरंजन आणि कनेक्टिव्हिटीसाठी अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. परंतु त्याचे नकारात्मक पैलूही मोठ्या प्रमाणावर दिसू लागले आहेत. ऑनलाईन गेमिंगसारखे प्लॅटफॉर्म, जे तरुण आणि अत्यंत लोकप्रिय आहेत, आता एक नवीन आणि धोकादायक ट्रेंड ‘गेमिंग जिहाद’ च्या स्वरूपात उदयास येत आहेत. या प्लॅटफॉर्मचा गैरवापर करून, कट्टरवादी, जिहादी गुन्हेगार केवळ हिंदू मुली/मुलांना अडकवण्याचे माध्यम निर्माण करत नाहीत, तर त्यांचे धर्मांतर करून लैंगिक शोषणासारख्या घृणास्पद गुन्ह्यांसाठी त्यांचा वापर करीत आहेत.
या प्रकरणांतील आरोपी तरुणाने सुरुवातीला मैत्रीपूर्ण केले, मात्र हळूहळू पीडितांना लांडग्याप्रमाणे अडकवण्यात आरोपी गुंडांना यश आले. आपली योजना पूर्णत्वास गेल्यानंतर आणि सावज पूर्णपणे जाळ्यात अडकल्यानंतर या जिहादी युवकांनी मुलींवर बलात्कार करणे, मानसिक छळ करणे आणि धर्मांतरासाठी पीडितेवर दबाव आणणे सुरू केले. अलीकडेच, ओडिशातील जगतसिंहपूर जिल्ह्यातून समोर आलेले धक्कादायक प्रकरणात, मोहम्मद समीर मन्सुरी नावाच्या आरोपीने ऑनलाईन माध्यमातून एका हिंदू मुलीशी मैत्री केली. मैत्री करून विश्वास संपादन केल्यानंतर तिला हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि अश्लील व्हिडीओ बनवून तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला. हे प्रकरण केवळ भयावह व गंभीरच नसून त्यामुळे ऑनलाईन गेमिंगची धोकादायक बाजू देखील समोर आली आहे.
'gaming jihad' : २०२२ ते २०२४ दरम्यान, देशभरात अशा घटना उघडकीस आल्या आहेत, जिथे कट्टरवादी, जिहादी गुन्हेगारांनी ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून हिंदू मुली-युवती आणि मुलांना आपल्या जाळ्यात अडकवले. यातील अनेक प्रकरणांमध्ये तर अल्पवयीन मुलांना देखील बळी बनवले गेले. प्रेमाच्या सापळ्यात अडकवून बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतरासाठी दबाव यासारख्या गुन्ह्यांमुळे या घटना अधिकच गंभीर झाल्या आहेत. याप्रकरणांमध्ये फ्री फायर, लोकप्रिय गेम्सचा वापर या जिहादी गुन्हेगारांनी केल्याचे उघडकीस आले आहे. हे गुन्हेगार प्रथम मुलींशी मैत्री प्रस्थापित करतात, नंतर भावनिक पातळीवर जोडून त्यांचे शारीरिक, मानसिक आणि धार्मिक शोषण करतात. अनेक प्रकरणांमध्ये, पीडितांवर ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून इस्लाम धर्म स्वीकारा अथवा गंभीर परिणामांना सामोरे जा अशाप्रकारच्या धमक्या देण्यात आल्या किंवा यासाठी दबाव आणला गेला.
'gaming jihad' : ‘गेमिंग जिहाद’च्या या घटनांमुळे समाजात एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म, ज्याचा उद्देश मनोरंजन आणि सामाजिक संबंध-संवाद प्रस्थापित करणे असले तरी ते आता गुन्हेगारीचे माध्यम बनले आहेत का? असा गंभीर मुद्दा उपस्थित होत आणि हा वाढता धोका रोखण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था पुरेशी आहे का? हा प्रश्न देखील आला आहे. या संदर्भातील वृत्तात ११ घटनांचे विश्लेषण आणि त्यांच्या सामाजिक आणि कायदेशीर आव्हानांवर चर्चा केली जाईल. ‘गेमिंग जिहाद’ वर आधारित हा अहवाल संपूर्ण समाजाला, समाजातील सर्वच घटकांना डिजिटल सुरक्षा व दक्षता किती महत्त्वाची आहे याबद्दल सतर्क करतो.
ऑनलाईन गेमिंगद्वारे हिंदू महिलेला अडकवल्याची घटना
तारीख : ०९ नोव्हेंबर २०२४
: जगतसिंहपूर (ओडिशा)
विवरण : जगतसिंहपूरमध्ये मुस्लिम युवक मोहम्मद समीर मन्सूरी याने ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून एका हिंदू महिलेला प्रेमात जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न केला. तरुणाने सुरुवातीला या हिंदू महिलेशी मैत्री केली आणि नंतर तिला आपल्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर महिलेवर बलात्कार केल्यानंतर त्याने तिचे अश्लील व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. आरोपीने महिलेवर धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. पीडित महिलेने हिंमत दाखवत भुवनेश्वर पोलिसांकडे तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी या मुस्लिम तरुणाला अटक केली.
ऑनलाईन गेमच्या माध्यमातून अल्पवयीन हिंदू मुलीला फसवले
तारीख : १९ ऑक्टोबर २०२४
स्थान : कच्छ (गुजरात)
विवरण : कच्छ जिल्ह्यातील झियाद उर्फ समीर शेख ऑनलाईन गेम खेळताना एका अल्पवयीन हिंदू मुलीशी संपर्क साधला. 'gaming jihad' आपण हिंदू असल्याचे खोटेच या मुस्लिम युवकाने त्या हिंदू युवतीला सांगितले आणि तिच्यावर प्रेम असल्याचे (खोटेच) दर्शविले. ही हिंदू युवती प्रेमात पुरती फसल्यावर एके दिवशी झियाद उर्फ समीर शेख याने तिच्यावर अत्याचार केला आणि तिचे आक्षेपार्ह फोटो काढून ते व्हायरल धमकी दिली. त्याने या हिंदू युवतीवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला आणि तिचा मानसिकरीत्या छळ केला. मुलीच्या कुटुंबीयांनी कच्छ पोलिसात आरोपी शेख विरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
फ्री फायर गेमद्वारे हिंदू मुलीला अडकवले
तारीख : २२ जून २०२४
स्थान : जमुई (बिहार)
विवरण : जमुई येथील गावातील मुस्लीम युवक मुहम्मद आसिफ अन्सारीने ‘फ्री फायर गेम’चा वापर करून सिवानमधील एका १४ वर्षांच्या हिंदू अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तरुणाने पीडितेला झाझा येथे बोलावून तिच्यावर अत्याचार केला. याठिकाणी त्याने तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत आरोपी मुहम्मद आसिफ अन्सारीला अटक विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
पब्जी गेमच्या माध्यमातून हिंदू महिलेला फसविले
तारीख : २३ एप्रिल २०२४
स्थान: मुरादाबाद (उत्तर प्रदेश)
विवरण : मुरादाबादच्या गलशहीद पोलिस स्टेशन परिसरात फुझैल या संशयित युवकाने पब्जीच्या माध्यमातून मुंबईतील माधुरी 'gaming jihad' मित्रा (काल्पनिक नाव) या हिंदू महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. फुझैलने माधुरीला मुरादाबाद येथे नेले तिला मुसलमान करून तिच्याशी निकाह केला. या घटनेदरम्यान महिलेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. पीडितेच्या कुटुंबीयांनी गलशहीद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आयपीसीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून फुझैलच्या मुसक्या आवळल्या.
ऑनलाईन गेमिंगद्वारे धर्मांतर करण्याचा प्रयत्न
तारीख : ३१ मे २०२३
स्थान : गाझियाबाद (उत्तर प्रदेश)
विवरण : कविनगर पोलिस स्टेशन राजनगरमध्ये एका १७ वर्षीय हिंदू तरुणाचे ऑनलाईन गेमिंग अॅपद्वारे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हिंदू युवकाला आपल्या हिंदू धर्माविषयी संभ्रमित करण्याचे, हिंदू धर्माविषयी खोट्यानाट्या कथा सांगण्याचे काम करण्यात आले. यासाठी मुस्लिम युवकांचा एक गट सामूहिकरीत्या प्रयत्न करीत होता. आपल्या मुलाला काही धर्मांध, जिहादी युवक ओढण्याचा प्रयत्न करीत असल्याचा संशय या हिंदू मुलाच्या आईला आला. तिने तातडीने गाझियाबाद पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी मुंबईतील एका व्यक्ती आणि काही स्थानिक लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अवैध धर्मांतर घडवून आणणार्या जिहादी कट्टरवाद्यांचे नेटवर्क किती व्यापक आहे, हे यावरून दिसून येते.
दोन सख्ख्या बहिणींची फसवणूक
तारीख : ८ २०२३
स्थान : उत्तरकाशी (उत्तराखंड)
विवरण : उत्तरकाशीच्या मोरी पोलिस स्टेशन परिसरात ‘नवाब’ या मुस्लिम तरुणाने ऑनलाईन गेमिंगद्वारे दोन अल्पवयीन हिंदू बहिणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. नवाबने या बहिणींना आमिष दाखवून त्यांना आराकोट येथे बोलावले. तिथे त्याने दोघींवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला. पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी पोलिसांत केली. त्यानंतर आरोपीला मुजफ्फरनगरमधून अटक करण्यात आली.
ऑनलाईन गेमिंग अॅपद्वारे धर्मांतराचा प्रयत्न
तारीख : १२ जून २०२३
स्थान : प्रयागराज (उत्तर प्रदेश)
विवरण : प्रयागराज येथे ऑनलाईन गेमिंग अॅपद्वारे तरुणाचे ब्रेन वॉशिंग करण्याचे प्रकरण उघडकीस आले. या अॅपच्या 'gaming jihad' माध्यमातून एका १६ वर्षीय हिंदू तरुणाचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात या तरुणाला इस्लामकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मुलाच्या आईने तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
‘फ्री फायर’ च्या माध्यमातून हिंदू महिलेला फसविले
तारीख : २४ जून २०२४
स्थान : सीकर (राजस्थान)
विवरण : सीकर जिल्ह्यातील तय्यब खान या तरुणाने ‘फ्री फायर गेम’ च्या माध्यमातून हर्षिता (काल्पनिक नाव) या हिंदू महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तरुणाने तिला आपल्या बोलण्यात अडकवून तिच्या मनात धर्मांतराची भीती निर्माण केली आणि शेवटी तिचे ब्रेनवॉश केले. हर्षिताच्या पतीने या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसात तक्रार केली. त्यानंतर आरोपी तय्यब खान विरुद्ध गुन्हा दाखल आला.
हिंदू कुटुंबावर धर्मांतरासाठी दबाव
तारीख : ३ ऑगस्ट २०२३
स्थान : गाझियाबाद (उत्तर प्रदेश)
विवरण : साहिबााबादमध्ये, मुस्लिम तरुण वलीद ऊर्फ मुस्तफा आणि कबीर ऊर्फ शाहजहानने ऑनलाईन गेमिंग अॅपचा वापर करून एका हिंदू कुटुंबावर धर्मांतरासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मुस्तफा आणि शाहजहानने पीडित हिंदू कुटुंबाकडून लाखो रुपयेही हडपले. कुटुंबीयांनी साहिबााबाद पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी टाकून आरोपींचा शोध सुरू केला.
‘फ्री फायर’ च्या सापळ्यात हिंदू विद्यार्थिनी
तारीख : १३ सप्टेंबर, २०२३
स्थान : मेरठ (उत्तर प्रदेश)
विवरण : मेरठच्या कादिर नावाच्या मुस्लिम युवकाने ‘फ्री फायर’ या ऑनलाईन गेमची मदत घेऊन एका हिंदू विद्यार्थिनीला 'gaming jihad' जाळ्यात अडकवले. यानंतर तरुणाने विद्यार्थिनीवर अत्याचार केला आणि तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला. घटनेनंतर आरोपी कादिरने घटनास्थळावरून पळ काढला. पीडित हिंदू विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी मेरठ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीवर आक्रमक कारवाई केली.
अल्पवयीन हिंदू मुलीला फसवले
तारीख : ७ जून २०२२
स्थान : बांदा (उत्तर प्रदेश)
विवरण : येथील एका मुस्लिम तरुणाने ऑनलाईन फ्री फायर हा गेम खेळून एका अल्पवयीन हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. आरोपीने मुलीला कौशांबी येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर तिला एका मदरशात नेऊन जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.
‘गेमिंग जिहाद’द्वारे सामाजिक ध्रुवीकरण
गेमिंग जिहादच्या या घटना केवळ वानगीदाखल उदाहरणे आहेत. अशा कित्येक घटना घडलेल्या आहेत ज्या अद्याप उघडकीस आलेल्या नाहीत. या घटनांमुळे ‘गेमिंग जिहाद’चे अतिशय काळे, बटबटीत, भयावह स्वरूप पुढे आले आहे. जिहादी, धर्मांध मुस्लिम युवक कशाप्रकारे या गेमिंग अॅपच्या माध्यमातून हिंदू महिला आणि अल्पवयीन आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात आणि त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात हे या घटनांमुळे स्पष्ट झाले आहे. ऑनलाईन गेमिंगमुळे सामाजिक ध्रुवीकरण आणि वैयक्तिक छळ कशा प्रकारे होत आहे हे या भयंकर घटनांवरून दिसून येते.
'gaming jihad' : ‘गेमिंग जिहाद’च्या अशा घटनांमुळे केवळ पीडित हिंदू महिला-युवतींचे जीवन उद्ध्वस्त झाले असे नसून यामुळे संपूर्ण समाजात व असुरक्षिततेचे वातावरणही निर्माण झाले आहे. या घटनांनी पीडित व्यक्तींच्या जीवनात केवळ शोकांतिकाच आणली नाही तर समाजात सखोल चिंतेचे संकेतही दिले आहेत. ऑनलाईन गेमिंगचा दुरुपयोग ज्या वेगाने वाढत आहे, तो सर्वांसाठी धोक्याचा इशारा आहे. यावरून हे स्पष्ट होते की तरुणांना आणि मुलांना ऑनलाईन सुरक्षिततेचे महत्त्व शिकवणे अत्यावश्यक झाले आहे आई-वडिलांनीही आपल्या मुलांच्या इंटरनेट क्रियाकलापांवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे.
'gaming jihad' : अशा भयंकर कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी देखील चपळाईने हालचाली करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची आवश्यकता आहे. प्रशासन आणि समाज या दोघांनी मिळून या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करायला हवा, जेणेकरून भविष्यात अशा घटना कमीत कमी करता येतील. कडक कायदे आणि जागरूकता माध्यमातून समाजाला एक सुरक्षित स्थान बनविण्याचे प्रयत्न अधिक वेगाने केले पाहिजेत. सर्व व्यक्तींना एक सुरक्षित आणि निरोगी जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि समाजातील कोणीही या अधिकाराचे उल्लंघन करू शकत नाही, हे आम्ही सुनिश्चित केले पाहिजे. ऑनलाईन विश्वातही सावधगिरी बाळगण्याची व दक्ष राहण्याची नितांत आवश्यकता आहे, हे या घटनांमधून आपण हवे.
(पांचजन्यवरून साभार)