राष्ट्ररक्षणाची भावना हाच मूळ स्वभाव

वनवासी बांधवांचे अफाट योगदान

    दिनांक :21-Nov-2024
Total Views |
संस्कृती
- प्रवीण गुगनानी
Vanvasi bandhav : स्वातंत्र्य चळवळीत भारतातील जनजाती अर्थात वनवासी समाजाचे व्यापक, विशाल व अफाट योगदान राहिले आहे हे आपण जाणतो. परकीय आक्रमकांविरुद्ध १८१२ ते १९४७ पर्यंत या समाजातील हजारो योद्ध्यांनी भारताची अस्मिता जपण्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला सर्वोच्च बलिदान दिले आहे. जनजाती समाजाची ही अंतर्गत संरचनाच एवढी वैशिष्ट्यपूर्ण आहे की या समाजाची नेहमीच देशाच्या मातीशी आपली नाळ जुळलेली दिसते. या समाजातील प्रत्येक पिढीने केवळ जनजाती परंपरा आणि राज्यांसाठीच संघर्ष केला असे नसून, जंगलांपासून नागरी समाजापर्यंत प्रत्येक देशी घटकाचे परकीयांपासून संरक्षण करण्याचे अभूतपूर्व कार्य केले आहे.
 
 
Vanvasi-6
 
ब्रिटिश ते अगदी आजतागायत वनवासी बांधव नागरी समाजाच्या वक्रदृष्टीचे बळी ठरले आहेत. इंग्रजांच्या दोनशे वर्षांच्या राजवटीत वनावासी समाजावर इंग्रजांनी गिधाडाची दृष्टी ठेवली. ब्रिटनमधून जेवढ्या काही राजकीय, आर्थिक आणि सामाजिक संघटना भारतात येत होत्या त्या सर्वांत प्रथम जनजाती समाजालाच धर्मांतरासाठी लक्ष्य करीत होत्या. वनवासींचे व्यापक स्वरूपात धर्मांतर करण्याचे कटकारस्थान ब्रिटनमधून आलेल्या संस्थांनीच रचले होते. भारतावर राज्य करण्यासाठी इंग्रजांना येथील जंगले, खनिज- खाणी आणि इतर नैसर्गिक संपत्तीचे शोषण करायचे होते आणि हे सर्व वनवासी-जनजाती भागात होते. या कामात इंग्रजांना जे अडथळे येत होते, जो प्रखर विरोध होत होता तो जनजाती, वनवासी समाजाकडूनच होत होता. इंग्रजांविरोधात वनवासींनी केलेले हल्ले हे नागरी समाजाच्या कितीदरी अधिक धारदार आणि प्राणघातक सिद्ध ठरले. जनजातींच्या या जबरदस्त संघर्षाने घाबरलेल्या इंग्रजांनी वनवासी समाजाला आपल्या धोरणांचे केंद्र बनवले होते. दबाव, दडपशाही, फसवणूक, आमिष- प्रलोभन या सर्व माध्यमातून ब्रिटिशांना वनवासी समाजावर नियंत्रण ठेवायचे होते. स्वाभिमानी वनवासी समाज कोणत्याही प्रकारे इंग्रजांना वश झाला नाही. गरीब आणि अतिशय कमी साधनसंपत्तीसह जीवन या जनजातीय समाजाने इंग्रजांसमोर कधीच शिर झुकवले नाही आणि त्यांच्या प्रलोभनाला हा समाज कधी बळीही पडला नाही. याचे कारण काय होते, असा प्रश्न येथे उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
 
 
Vanvasi bandhav ; वनवासी सतत दोनशे वर्षांपर्यंत इंग्रजांशी सतत लढत राहिले. पण ते कधीच दबले नाहीत. त्या काळात दळणवळणाची, संवाद-संचाराची माध्यमे नव्हती. देशातील दुर्गम, सुदूर जंगलात राहणार्‍या वनवासींमध्ये एकच साम्य होते आणि ते म्हणजे सर्व वनवासी, जनजाती समूह मातृभूमीसाठी, संस्कृती रक्षणासाठी आणि परंपरांच्या रक्षणासाठी प्रखर संघर्ष करीत होते, लढत होते. ब्रिटिशांनी धर्मांतरासाठी त्यांच्यावर ज्या प्रकारचा अत्याचारी दबाव टाकला होता, त्यांनी ज्याप्रकारे कोट्यवधी रुपयांचे आरोग्य आणि शिक्षणाचे प्रकल्प वनवासींसाठी राबविले होते, ते पाहता स्वातंत्र्यापर्यंत वनवासी समाजाचे अस्तित्व जवळजवळ नष्ट व्हायला हवे होते. पण, तसे काहीही झाले नाही. उलट कुठल्याही दबावाला न जुमानता अधिक जोमाने, ठामपणे, आत्मविश्वासाने वनवासी बांधव आपल्या परंपरा, संस्कृती रक्षणार्थ उभे ठाकले. वनवासी समाजाच्या या इच्छाशक्तीचे, जगण्याच्या, अस्तित्वाच्या इच्छेचे मूळ काय होते? हा निश्चितच अभ्यासाचा विषय आहे.
 
 
जनजाती समाजाच्या इच्छाशक्तीचे अत्यावश्यक म्हणजे त्यांचे बडेदेव, देव परंपरा, पूजा-उपासनेची पद्धत, निसर्गाला देव मानण्याची त्यांची श्रद्धा-आस्था आणि सर्वांत मोठी गोष्ट, त्यांचे भगत, भूमका, बडवे, भोपे इत्यादी. जनजाती बांधवांची समाजव्यवस्था देखील त्यांच्या या ताकदीचे प्रमुख कारण होते. जनजाती समाज हा आपापल्या स्थानिक टोळी-गटातील भगत, भूमका, बडवे, भोपे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात एकजूट राहणे हाच आपला असल्याचे मानत होता. जनजाती समाजाचे हे भगत, भूमका देखील आपल्या वैचारिक ढालच्या भूमिकेत ठाम राहिले. हे देखील खरे आहे की जर हे जनजाती समाज इंग्रजांच्या अधीन झाले असते तर कदाचित इंग्रजांनी आजही भारत सोडला नसता. आणि हे देखील सत्य आहे की जनजाती आणि वनवासी समुदाय इंग्रजांशी केवळ आणि केवळ समाजव्यवस्था व ईश्वरावरील निष्ठा व प्रेमामुळेच ब्रिटिशांविरुद्ध लढू शकला होता. म्हणूनच वनवासी समाज हा भारताचा सामरिक कणा मानला गेला आहे.
 
 
Vanvasi bandhav : आजही देशातील तथाकथित सुसंस्कृत व सभ्य समाज जनजाती समाजाच्या देव परंपरेचे मर्म समजून घेऊ शकलेला नाही. आज जनजाती समाजाची देव परंपरा हळूहळू आमच्या ग्रामीण भागात शिरली असून अनेक ठिकाणी भागात या जनजाती देवी-देवतांची पूजा केली जाते. आज आपल्या जवळपास सर्व गावे, कसबा, शहरांच्या वेशीवर आढळणारी खेडापती मंदिरे जनजाती देव परंपरेचेच एक अंग आहे. बडादेव, बुढादेव, फडापेन, घुटालदेव, भैरमदेव, डोकरादेव, चिकटदेव, लोधादेव, पाटदेव, सियानदेव, ठाकूरदेव इत्यादी देवता आज वनवासी देवता आज वनवासी समाजाव्यतिरिक्त ग्रामीण भागात देखील पूजनीय देवता मानल्या ही देव परंपराच गहन अरण्यात राहणारा आरण्यक समाज, ग्राम-खेड्यातील ग्रामीण समाज आणि शहरांतील नागरी समाजच्या अस्तित्वाचे, टिकून राहण्याच्या इच्छेचे सार आहे. ही परंपरा आपण जेवढी जपू, तिचे संरक्षण करू, तितका आपला स्वदेश टिकून राहू शकेल.
 
 
धर्मांतराच्या विरोधात मजबूत ढाल
महात्मा गांधींनी २३ एप्रिल १९३१ च्या यंग इंडियाच्या अंकात लिहिले ‘एका व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीचे धर्मांतर करावे हे मला मान्य नाही. दुसर्‍याच्या धर्माला कमी लेखण्याचा विचार देखील आपल्या मनात येऊ नये. याचा अर्थ सर्व पंथाच्या सत्यावर विश्वास ठेवणे आणि त्यांचा आदर करणे. याचा अर्थ आहे खरी नम्रता. मानवतावादी कार्याच्या नावाखाली धर्मांतर करणे हे आजारी मानसिकतेचे लक्षण आहे, असे माझे मत याच लोकांकडून याचा सर्वाधिक विरोध होतो. शेवटी, धर्म ही नितांत वैयक्तिक बाब आहे आणि ती हृदयाला भिडते. ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणार्‍या आणि माझ्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांचा पंथ ख्रिश्चन आहे या एकमेव कारणास्तव मी माझा धर्म का म्हणून बदलू? किंबहुना डॉक्टरांच्या प्रभावाखाली येऊन मी माझा धर्म बदलावा अशी अपेक्षा तरी का करावी?
 
 
Vanvasi bandhav : गांधीजींच्या या विचारांची काँग्रेसला प्रत्यक्ष व्यवहारात कधीच अंमलबजावणी करता आली नाही. काँग्रेस नेहमीच गांधीजींच्या या विचारांच्या प्रतिकूल राहिली, हेच त्यांच्यासाठी घातक सिद्ध झाले. यामुळेच भारतातील बहुतांश धर्मांतर हे अशिक्षित, गरीब आणि मागासवर्गीय लोकांचे झाले. हे गैरकृत्य नंतर ‘समाजतोडक’ च्या स्वरूपात समोर आले. अनेक समुदायांनी सरकार दरबारी स्वत:ची हिंदू म्हणून न करणे हा याच मानसिकतेचा परिणाम आहे. झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये कटकारस्थान रचून वनवासी समाजाचे झपाट्याने धर्मांतर करण्यात येत आहे, ही अतिशय चिंतेची बाब आहे. प्यू रीसर्चने आपल्या २०२१ च्या सर्वेक्षणात असे लिहिले आहे की या राज्यांमध्ये ख्रिश्चन धर्माचे पालन करणारे ६४ टक्के अनुसूचित जमातीतून धर्मांतरित झालेले आहेत. धर्मांतराच्या दुष्ट मोहिमेत मिशनरी हिंसक होत आहेत. २००८ मध्ये ओडिशातील कंधमाल येथे स्वामी लक्ष्मणानंदजी यांची झालेली हत्या कोण विसरू शकेल? ईशान्येकडील राज्यांमध्ये साध्याभोळ्या वनवासी बंधूंना रक्तरंजित संघर्षांचा सामना करावा लागत आहे. ओडिशातील सुंदरगड, केओंझार आणि मयूरभंज जिल्ह्यातील ख्रिश्चन लोकसंख्या धक्काक्कादायक आहे. झारखंडमधील वनवासी समाज टक्क्यांनी कमी झाला आहे. त्याच राज्यात रांची, खुंटी, सिमडेगा, लोहरदगा, गुमला, पलामू, लातेहार, कोल्हान आणि संथाल परगणा जिल्ह्यात मोठ्या संख्येत वनवासी धर्मांतरित झाले आहेत. मध्य प्रदेशातील छिंदवाडा, बैतुल, झाबुआ, खरगोन, बडवानी आदी जिल्ह्यांंमध्ये वनवासी समाजाचे मोठ्या संख्येत शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या नावाखाली आमिष दाखवून धर्मांतर करण्यात आले आहे. ख्रिश्चन कट्टरवादी धर्मांध मुस्लिमही मुलींची तस्करी, लव्ह जिहाद, लँड जिहाद, इंटरनेट कॅफे इत्यादींच्या माध्यमातून मोठ्या संख्येने वनवासींचे धर्मांतर करीत आहेत. 
 
(पांचजन्यवरून साभार)