मोदींनी गयानामध्ये घेतली वेस्ट इंडीजच्या क्रिकेट दिग्गजांची भेट

22 Nov 2024 21:22:56
जॉर्जटाऊन, 
क्रिकेट हा खेळ भारताला वेस्ट इंडीजशी जोडणारा एक अनोखा बंध असे PM Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेस्ट इंडीजमधील प्रमुख क्रिकेट दिग्गजांशी संवाद साधताना म्हणाले. पंतप्रधान मोदी यांचे बुधवारी गयाना येथे आगमन झाले. ५० वर्षांहून अधिक काळानंतर भारतीय पंतप्रधानांची ही वेस्ट इंडीजला पहिलीच भेट आहे. शुक्रवारी त्यांनी गयानाचे अध्यक्ष इरफान अली यांच्यासह क्रिकेट क्षेत्रातील मान्यवरांची भेट घेतली. यावेळी वेस्ट इंडीजचे माजी क्लाईव्ह लॉईड, संघाचा माजी विश्वचषक विजेता कर्णधार, फलंदाज अल्विन कालिचरण व माजी फिरकी गोलंदाज देवेंद्र बिशू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. या भेटीदरम्यानचे छायाचित्र समाजमाध्यमात सामायिक करण्यात आले.
 
 
MODI-CRICKETER-0
 
मैत्रीची खेळी! भारताचे PM Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी व गयानाचे अध्यक्ष इरफान अली यांनी आज जॉर्जटाऊनमध्ये वेस्ट इंडीजमधील प्रमुख क्रिकेट दिग्गजांची घेतली, असे परराष्ट्र मंत्रालयाने एक्सवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. क्रिकेट भारताला कॅरिबियनशी जोडते जसे इतर माध्यम नाही! असे त्या छायाचित्राखाली लिहिले आहे. तीन देशांच्या दौर्‍याच्या शेवटच्या टप्प्यावर पंतप्रधान मोदी गयानामध्ये आहेत. या भेटीमध्ये नायजेरियाच्या उत्पादक सहलीचा समावेश होता. १७ वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांचा पश्चिम आफ्रिकन देशाचा हा पहिला दौरा होता. मोदी जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्राझीलला गेले होते.
Powered By Sangraha 9.0