- १ कोटी ७२ लाख ९३ हजार ६५० मतदान
मुंबई,
१५ व्या Assembly elections विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानात राज्यातील जनतेने भाजपाच्या झोळीत कोट्यवधी मते टाकल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. या निवडणुकीत सहा प्रमुख निवडणूक लढवली, पण भाजपा वगळता कोणालाही एक कोटीच्या आसपास पोहोचता आले नाही.
Assembly elections यावेळी भाजपाला १ कोटी ७२ लाख ९३ हजार ६५० मतदान झाले असून, त्याखालोखाल काँग्रेस, शिवसेना, शरद पवार गट नंतर उबाठा आणि सर्वांत कमी राष्ट्रवादी काँग्रेसला मते मिळालीत. अजित पवारांनी सर्वांत कमी जागा लढवल्याचा हा परिणाम असला तरी, स्ट्राईक रेट ८० टक्के असून, भाजपानंतर दुसर्या क्रमांकाचा आहे. भाजपाचा स्ट्राईक रेट ८९ टक्के इतका सर्वाधिक आहे. काँग्रेससारख्या जुन्या राष्ट्रीय पक्षाला केवळ ८० लाख मते मिळाली असून, त्यांचा स्ट्राईक रेट १५ टक्केच आहेत. त्याचवेळी उबाठा गटाला ६४ लाख ३३ हजार मते मिळाली असून, सर्वांत खराब कामगिरी त्यांची आहे. त्यांचा रेट केवळ ११ टक्के आहे. महाआघाडीत सर्वांत चांगला स्ट्राईक रेट शरद पवारांचा २० टक्के असला तरी, सर्वांत कमी म्हणजे केवळ १० जागा त्यांना मिळाल्या आहे.
महायुती
पक्ष मतांची टक्केवारी मिळालेली मते स्ट्राईक रेट
भाजपा २६.७७ १,७२,९३,६५० ८९
शिवसेना १२.३८ ७९,९६,९३० ६७.०५
राष्ट्रवादी काँग्रेस ०९.०१ ५८,१६,५६६ ८०.३९
महाविकास आघाडी
पक्ष मतांची टक्केवारी मिळालेली मते स्ट्राईक रेट
काँग्रेस १२.४२ ८०,२०,९२१ १५.६८
शरद पवार गट ११.२८ ७२,८७,७९७ २०.८३
उबाठा ०९.९६ ६४,३३,०१३ ११.५२