असहकार्यामुळेच माझा पराभव !

24 Nov 2024 20:17:58
नागपूर,
 
 
Duneshwar Pethe-Nagpur पूर्व नागपूरात महाविकास आघाडीच्या सहयोगी पक्षाने विजय मिळविण्यासाठी काँग्रेसने कोणत्याही प्रकारे सहकार्य न केल्यामुळेच पराभवाचा सामना करावा लागला असल्याचे स्पष्ट मत दुसर्‍या क्रमांकावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार दुनेश्वर पेठे व्यक्त केले.
 
 
 

Duneshwar Pethe-Nagpur 
 
 
 
Duneshwar Pethe-Nagpur पूर्व नागपुरातील जनतेने दिलेला कौल मी मान्य करीत आहे. महाविकास आघाडीचा पराभव होण्यामागील कारणांचा आढावा घेतल्यानंतर पक्षश्रेष्ठीकडे याबाबत तक्रार करणार आहे. भाजपाचे उमेदवार कृष्णा खोपडे यांनी सर्वांचे डिपॉझिट जप्त केले आहे. तिरंगी लढत होईल, असा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र, पूर्व नागपूरात केवळ विकास कामाचा फॅक्टर चालला. काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आभा पांडे यांनी बंडखोरी करीत खोपडेंच्या विरोधात रिंगणात उतरल्या होत्या.
 
 
 
Duneshwar Pethe-Nagpur मात्र त्या लढतीत मागे पडल्या. पूर्व नागपूरात काँग्रेसचा उमेदवार नसल्याने पुरुषोत्तम हजारे यांनी बंडखोरी केली, त्यांनाही फारसे मत येथे घेता आले नाही. मतविभाजनाचा लाभ होईल, असा अंदाज बांधण्यात आला होता. परंतू तो फोल ठरला. कृष्णा यांना मतदारांना भरघोस मतदान करीत विजयी केले आहे.
Powered By Sangraha 9.0