पाकिस्तानात अजूनही परिस्थिती गंभीर, 24 तासांत 37 जणांचा मृत्यू!

24 Nov 2024 11:00:00
पेशावर,
Pakistan News : पाकिस्तानच्या अशांत खैबर पख्तुनख्वा प्रांतात आदिवासी गटांमधील हिंसाचारात गेल्या 24 तासांत किमान 37 लोक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या कुर्रम जिल्ह्यात गुरुवारी प्रवासी व्हॅनवर झालेल्या हल्ल्यानंतर अलीझाई आणि बागान आदिवासी गटांमध्ये हिंसाचार झाला. पॅसेंजर व्हॅनवर झालेल्या हल्ल्यात 47 जणांचा मृत्यू झाला होता. हेही वाचा : भावाच्या तीन तर भाऊ-बहिणीच्या २ जोड्या विधानसभेत !
 

pak 
 
आदिवासी एकमेकांना लक्ष्य करत आहेत
 
Pakistan News : प्रशासन आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी हेलिकॉप्टरने परिसरात पोहोचले आहेत. "आतापर्यंत किमान 37 लोक ठार झाले आहेत," असे एका अधिकाऱ्याने मीडियाला सांगितले. मृतांचा आकडा अजूनही वाढत आहे, 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. आदिवासी समाजातील लोक स्वयंचलित शस्त्रे वापरून एकमेकांना लक्ष्य करत आहेत. हिंसाचारात घरे आणि दुकानांना लक्ष्य करण्यात आले, त्यानंतर विविध गावांतील लोक सुरक्षित ठिकाणी गेले. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून शनिवारी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्याला 'प्रायव्हेट एज्युकेशन नेटवर्क'चे अध्यक्ष मुहम्मद हयात हसन यांनी दुजोरा दिला. हेही वाचा : संबळमध्ये पुन्हा गोंधळ...जामा मशिदीबाहेर उपद्रव !
 
वाहनांवर गोळीबार झाला
 
Pakistan News : गुरुवारी बागान, मंडुरी आणि ओछाटमध्ये 50 हून अधिक वाहनांवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये महिला आणि लहान मुलांसह 47 जणांचा मृत्यू झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मृतांपैकी बहुतांश शिया समुदायातील आहेत.
Powered By Sangraha 9.0