छत्रपती संभाजीनगर,
suicide-Harshvardhan Jadhav महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरले. तर, काही जणांसाठी हे निकाल जिव्हारी लागणारे ठरले. आपला आवडता उमेदवार जिंकून न आल्यामुळे दाेन युवकांनी विषप्राशन केल्याची दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली. कन्नड मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून हर्षवर्धन जाधव रिंगणात हाेते.
(संग्रहित छायाचित्र)
suicide-Harshvardhan Jadhav कन्नड तालुक्यातील जामडी घाट येथे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचा पराभव जिव्हारी लागल्याने दाेन युवकांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुनील रामदास शिरसाठ आणि आनंद वसंत जाधव अशी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकांची नावं आहेत.त्यांच्यापैकी एकावर कन्नडच्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दुसèयाला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आले.
suicide-Harshvardhan Jadhav ‘दादा पडायला नाही पाहिजे हाेता,’असं म्हणत त्या दाेघांनी विष घेतल्याचे संबंधित वृत्तात म्हटले आहे. कन्नड विधानसभा मतदारसंघात अपक्ष उभारलेले हर्षवर्धन जाधव यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. ‘दादा पडायला नाही पाहिजे हाेता, आता आम्ही काय करू,’ असा टाहाे फोडत त्यांनी हा जीवघेणा मार्ग पत्करल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलं. हर्षवर्धन जाधव यांनी हात जाेडून असं काेणतंही पाऊल न उचलण्याची विनंती समर्थकांना केली आहे.
suicide-Harshvardhan Jadhav ‘पिक्चर अभी बहाेत बाकी है, असं म्हणत तरुणांना सगळं संपलंय, असं समजू नका. अजून तर सुरुवातसुद्धा झाली नाही. मला स्वत:ला विकावं लागलं तरी विकेन पण, तुमच्या आशा आकांक्षा वाया जाऊ देणार नाही,’ असा शब्द हर्षवर्धन जाधव यांनी दिला आहे. आत्महत्येचा प्रयत्न, विष पिण्यासारखे उद्याेग करू नका. आपल्या मतदारसंघात आपणच राजे आहाेत. मला विकावं लागलं तरी चालेल पण, तुम्हाला ईजा हाेऊ देणार नाही, असं म्हणत हर्षवर्धन जाधव यांनी हात जाेडून तरुणांना विनंती केली आहे.