पाच वर्षे आमदारकीचा थाट, आता मतदारांनी फिरवली पाठ!

25 Nov 2024 18:13:35
मुंबई, 
Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. मतदारांनी महायुतीच्या पदरात मतांचे दान टाकले खरे, पण सोबतच अनेक विद्यमान आमदारांना पराभवाची चव चाखायला भाग पाडले. अनेक ठिकाणी तर मतदारांनी प्रस्थापितांचा पुरता धुव्वा उडवला. यंदाच्या निवडणुकीत तब्बल ६५ आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला. एवढेच काय तर, सहा आमदारांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे.
 
 
Assembly Elections 2024
 
 
 
 चौदाव्या विधासभेतील १८५ आमदार पुन्हा पंधराव्या विधानसभेत दिसणार आहेत. पराभूत आमदारांमध्ये सर्वाधिक १९ काँग्रेसच्या व राष्ट्रवादी काँगे्रसच्या १० आमदारांचा समावेश आहे. शरद पवार गटाचे ८ आणि उद्धव ठाकरे गटाचे ७ आमदार पुन्हा जिंकू शकले नाहीत. शिवसेनेचे ६, भाजपाचे ५, बहुजन विकास आघाडीचे ३, प्रहारचे २, एमआयएम आणि मनसेचा एक आणि तीन अपक्ष आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला. Assembly Elections 2024 या सर्व आमदारांना मतदारांनी नाकारल्याचे निवडणूक निकालांमध्ये स्पष्ट झाले. शरद पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाèया पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक २० विद्यमान आमदार निवडणुकीत पराभूत झाले. त्यानंतर विदर्भातील १२ आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईतील ८ आमदारही निवडणूक जिंकू शकले नाहीत.
मुंबईतील ‘या' विद्यमान आमदारांचा पराभव
मुंबईतही अनेक प्रस्थापित विद्यमान आमदारांना मतदारांनी पराभव चाखायला भाग पाडले. त्यात वर्सोव्यातून भारती लवेकर, भायखळ्यातून यामिनी जाधव, माहीममधून सदा सरवणकर, वांद्रे पूर्वमधून झिशान सिद्दिकी, चेंबूरमधून प्रकाश फातेर्पेकर, अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके, भांडुपमधून रमेश कोरगांवकर आणि आपला मतदारसंघ सोडून मानखुर्दमधून निवडणूक रिंगणात उतरलेले नवाब मलिक यांचा समावेश आहे.
‘यांचे' डिपॉझिटही जप्त
निवडणूक रिंगणात उतरलेल्या विद्यमान आमदारांपैकी काही आमदारांचा तर पार सुपडा साफ झाला. सहा आमदारांना एकूण मतांपैकी १६ टक्के मतेही मिळवता आली नाहीत.Assembly Elections 2024  त्यात मीरा-भाईंदरमधून गीता जैन, मानखुर्दमधून नवाब मलिक, मेळघाटमधून राजकुमार पटेल, मोर्शीतून देवेंद्र भुयार, गेवराईतून लक्ष्मण पवार आणि आष्टीमधून बाळासाहेब आजबे यांचा समावेश आहे.
Powered By Sangraha 9.0