खासदार सांस्कृतिक महोत्सव 2024

हिंदी कवी आणि वक्ते डॉ. कुमार विश्वास यांची विशेष उपस्थिती राहणार

    दिनांक :25-Nov-2024
Total Views |
-नितीन गडकरी यांची आज पत्रकार परिषद..
-दहा दिवसांची सांस्कृतिक मेजवानी
नागपूर,
Khasdar Sanskrutik Mahotsav डिसेंबर महिन्यात,  गारव्यात रंगत आणणाऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा यंदाचे नववे (९) पर्व अधिक भव्य आणि आकर्षक ठरणार आहे. 13 ते 22 डिसेंबर दरम्यान हनुमाननगरातील क्रीडा चौक, ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार महोत्सवाची आज पत्र परिषद झाली. परिषदेत नितीन गडकरी ,अनिल सोले, कृष्णा खोपडे, मिलिंद माने, सुलेखा कुंभारे यांची उपस्थिती होती.
 

Khasdar Krida Mahotsav 
 
 
नियोजन असे राहणार
Khasdar Sanskrutik Mahotsav खासदार सांस्कृतिक महोत्सव 2024 चे उद्घाटन 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता प्रसिद्ध अभिनेत्री काजोल यांच्या हस्ते होणार आहे. 'बाजीगर', 'डीडीएलजे' यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या पद्मश्री काजोल यांच्या उपस्थितीमुळे महोत्सवाला नवी झळाळी मिळणार आहे.
Khasdar Sanskrutik Mahotsav या महोत्सवात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार तसेच स्थानिक कलाकार आपली कला सादर करतील. सकाळ व संध्याकाळच्या दोन सत्रांत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि कलात्मक कार्यक्रमांची मेजवानी नागपूरकरांना अनुभवता येणार आहे.महोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये हिंदी कवी आणि वक्ते डॉ. कुमार विश्वास यांचा विशेष सहभाग असेल. त्यांचे सादरीकरण प्रेक्षकांना रामायणाच्या भावमय वातावरणात घेऊन जाईल. नागपूरकरांसाठी हा सांस्कृतिक महोत्सव फक्त कलात्मक सादरीकरण नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक एकजुटीचा उत्सव ठरणार आहे.