ते फडण‘वीस’ तर आपणही ‘वीस’!

Thackeray-Fadnavis उद्धव ठाकरेंना अजूनही विश्वास

    दिनांक :25-Nov-2024
Total Views |
मुंबई,
 
 
 
Thackeray-Fadnavis ते फडण‘वीस’ असले तरी आपण ‘वीस’ आहाेत, आपण त्यांना पुरून उरू, असा विश्वास शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या नवनिर्वाचित आमदारांसमाेर व्यक्त केला. प्रचंड आणि दारुण पराभवाला सामाेरे गेलेल्या शिवसेना उबाठा गटाकडून आज नवनिर्वाचित 20 आमदारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये आमदारांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी केला. दरम्यान, आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
 

Thackeray-Fadnavis 
 
 
 
Thackeray-Fadnavis आज शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. पक्ष प्रताेदपदी सुनील प्रभू यांचीच निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल काही जणांसाठी धक्कादायक आहेत. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले की, मला सात टर्म आमदारकीचा अनुभव आहे. माझं म्हणणं हाेतं की, आदित्य ठाकरे यांना गटनेता म्हणून नियुक्तकरण्यात यावे. पण, उद्धव साहेबांनी हा आदेश दिला. त्यामुळेच मी गटनेता म्हणून शिवसेनेचं काम करणार असून, सर्व प्रश्न मांडणार आहे.
 
 
Thackeray-Fadnavis विराेधी पक्षनेता महाविकास आघाडीचा एकत्र मिळून व्हावा यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीमध्ये संख्याबळ आमचं जास्त असल्याने विराेधी पक्षनेता आमचा म्हणजे शिवसेनेचा हाेईल. मला संधी दिली तर नक्कीच विराेधी पक्षनेता व्हायला आवडेल. सरकार सक्षमपणे चालवण्यासाठी विराेधी पक्ष असावा आणि त्यासाठी विराेधी पक्षनेतेपद असावं. सत्ताधाऱ्यांनीसुद्धा असा विचार करून, विराेधी पक्ष पदासाठी विचार करायला हवा, असंही ते म्हणाले. दुसरीकडे अंबादास दानवे म्हणाले की, इतर पक्षांप्रमाणेच आमच्या पक्षातील विधिमंडळ नेत्यांची निवड करण्यात आली आहे. आमचा काेणीही आमदार फुटणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. शिंदेंकडून चुकीचे आराेप करण्यात येत असल्याचेसांगून, आदित्य ठाकरे यांची निवड नियमाप्रमाणे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.