आर्वीत कार्यकर्त्यांचा आग्रह; दादाराव केचे पुन्हा सक्रीय

25 Nov 2024 20:24:54
तभा वृत्तसेवा
 
 
आर्वी, 
 
Wardha-Arvi-Keche भाजपा पक्षश्रेष्ठींनी तिकिटाचे आश्‍वासन दिल्याने आपण तयारी केली. ऐनवेळी तिकीटासाठी डावलण्यात आले. आपण अपक्ष व भाजपाकडून उमेदवारी दाखल केली. उमेदवारी मागे घेण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. आपण उमेदवारी मागेही घेतली. Wardha-Arvi-Keche उमेदवार सुमित वानखेडे यांच्यासाठी सभा घेतल्या. परंतु, आपल्यावर प्रचार न केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याने आपण राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, कार्यकर्त्यांच्या आग्रहाने आपण आपला संन्यास मागे घेतला असून सक्रीय होऊ अशी माहिती माजी आमदार दादाराव केचे यांनी आज 25 रोजी सहकार मंगल कार्यालयात प्रसार माध्यमांसोबत बोलताना दिली.
 
 
 

Wardha-Arvi-Keche 
 
 
 
यावेळी माजी आमदार दादाराव केचे म्हणाले की, आपल्यावर निवडणूक निकालापूर्वी आरोप प्रत्यारोप करण्यात आले. हे आरोप प्रत्यारोप करणारे दुसरे कोणी नाही, आपल्याच पार्टीतील कार्यकर्ते होते. Wardha-Arvi-Keche कार्यकर्त्यांमध्ये फूट पडू नये कार्यकर्ता एकजूट राहावे. याच भावनेतून आपण नेहमी कार्य केलेले आहे. आर्वी विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टीला मोठं करण्याचं काम कार्यकर्त्यांनीच केले आहे. राजकारणापासून संन्यास घेताना भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सुमित वानखेडे 110 निवडून येईल, असे म्हटले होते. आपण प्रचार केला, भाषणे दिली. मात्र, आपल्यावर काम न केल्याचा ठपका ठेवल्याने आपण पक्षच नव्हे तर राजकारणातून संन्यास घेण्याचे जाहीर केले होते. पण, कार्यकर्त्यांचा आग्रह आपल्याला टाळणे शक्य झाले नाही. Wardha-Arvi-Keche पक्षहित लक्षात घेऊन आपण राजकारणात सक्रीय होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
 
 
 
यावेळी व्यासवर राजू राठी, धर्मेंद्र राऊत, गौरीशंकर अग्रवाल, विनय डोळे, सुरेश नागपुरे, आदींची उपस्थिती होती. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आरोप प्रत्यारोप होऊन दादाराव केचे यांनी संन्यास घेण्याचा निर्णय आदल्या दिवशी घेतला. दुसर्‍या दिवशी मतमोजणीत विजय झाल्यानंतर आ. सुमित वानखेडे यांनी केचे यांच्या निवासस्थानी जाऊन आशीर्वाद घेतले होते. Wardha-Arvi-Keche यावेळी जिल्हा संयोजक सुधीर दिवे आणि संदीप काळे, प्रशांत सव्वालाखे उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0