सिरोंचा,
solarplate stolen तालुक्यातील कोटापल्ली येथील अंगणवाडी केंद्रावर सौर प्लेट संच बसविलेला आहे. सदर सौर प्लेटची चोरी अज्ञात चोरट्यांनी मागील आठवड्यात केल्याची माहिती अंगणवाडी कर्मचार्यांनी दिली. दिवाळीत शाळा व अंगणवाड्यांना सुट्या होत्या. त्यामुळे निर्मनुष्यतेचा गैरफायदा घेत चोरट्यांनी सौरप्लेट लंपास केले.
solarplate stolen कोटापल्ली येथील अंगणवाडी केंद्रावर दोन सौर प्लेट बसविलेले आहेत. दिवाळी सणादरम्यान सुट्या असल्याने अंगणवाडी केंद्र बंद होते. याचाच गैरफायदा घेत चोरट्यांनी दोनपैकी एक सौरप्लेट लंपास केले. शाळा सुरू झाल्यानंतर एक दिवस अंगणवाडी केंद्रावरील सौर प्लेट लंपास झाल्याचे दिसून आल्यानंतर याबाबतची माहिती अंगणवाडी कर्मचार्यांनी वरिष्ठांना दिली. तसेच पोलिस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. रेगुंठा परिसरात कृषीपंपासह शेतातील विविध वस्तूंची चोरी करणारी टोळी सक्रिय होती. आता सौर प्लेटची चोरी झाल्याने गावातील कोणाचातरी यात सहभाग तर नसावा ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, या घटनेचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. गावातील संशयित लोकांची नावे गोपनीय पद्धतीने काढण्याचे काम सुरू आहे. याशिवाय टॉवर लोकेशनद्वारेही चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.