पुन्हा एकदा ईव्हीएमचे रडगाणे

26 Nov 2024 20:29:03
- शरद पवार, ठाकरे उभारणार आंदोलन

मुंबई, 
विधानसभा निवडणुकीत मविआचा दारुण पराभव झाल्यानंतर आता पुन्हा एकदा विरोधकांनी EVM issue ईव्हीएमचे रडगाणे केल्याचे चित्र बाघायला मिळत आहे. यासाठी आंदोलन उभारण्याचे सूतोवाच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीत उबाठा गटाचा दारुण पराभव झाला. त्यांच्या पदरात केवळ २० जागा पडल्या. हे सर्व अनाकलनीय आणि अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्यानंतर नवनिर्वाचित आमदार आणि पराभूत उमेदवारांसोबत उद्धव यांनी चर्चा केली व पराभवाची कारणे जाणून घेतली. आता ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारण्यासंदर्भात सुतोवाच केले. दुसरीकडे, शरद पवारांचा गटही ईव्हीएमबाबत न्यायालयीन लढाई लढण्याची भाषा करीत आहे.
 
 
sharad-udhav
 
EVM issue : महाविकास आघाडीचा झालेला पराभव अजूनही आघाडीच्या नेत्यांच्या पचनी पडत नाही. त्यातून पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली आहे. ईव्हीएममुळेच गोंधळ झाला त्यातच, आता उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतील इतर नेत्यांशी बोलून ईव्हीएम विरोधात सामाजात भ्रम निर्माण करण्यासाठी काहीतरी फेक नॅरेटिव्ह पसरविण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. त्यासाठी ठाकरे नेहमीप्रमाणे माध्यमे, समाज माध्यमांद्वारे बोंबाबोंब करतील तर, पवार गटाच्या बैठकीत उमेदवारांनी केलेल्या तक्रारींवर कायदेशीर पावले उचलण्यासाठी वकिलांची टीम तयार करण्याचा शरद पवारांनी निर्णय घेतला. राज्यपातळीवर आणि केंद्रीय पातळीवर कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम तयार केल्याचे समोर आले आहे.
 
 
केवळ आरोप करण्यापेक्षा EVM issue ईव्हीएम बाबत जे आक्षेप आहेत किंवा निवडणूक प्रक्रियेत ज्या चुकीच्या बाबी घडल्या, ते सर्व पुरावे गोळा करण्याच्या सूचना शरद पवार यांनी उमेदवारांना केल्या आहेत. २८ तारखेपर्यंत व्हीव्हीपॅट तपासणीसाठी वेळ असल्याने उमेदवारांनी तत्काळ व्हीव्हीपॅट करावी, अशी सूचनाही त्यांनी केल्याचे समजते. अर्थात, शरद पवार देखील नुसती नौटंकीच करीत असल्याचे स्पष्ट असले तरी, ते कायदेशीर या शब्दाच्या प्रभावात बुचकाळ्यात टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे तर, ते फडणवीस असतील तर आपण वीस आहोत, अशा टोमण्यांच्या नंदनवनात वावरताना दिसत आहेत.
Powered By Sangraha 9.0