मुंबई,
विरोधकांच्या वारंवार मागणीनंतर विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्याच्या पोलिस महासंचालक पदावयून निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईस्तोवर दूर करण्यात आलेल्या IPS Rashmi Shukla आयपीएस रश्मी शुक्ला यांची महासंचालकपदी पुर्ननियुक्ती करण्यात आली. शुक्ला यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर केल्यानंतर, अनेक पोलिस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र, रश्मी यांची बदली करण्यात आली नव्हती. त्यांच्या बदलीवरून विरोधक वारंवार आग्रही दिसले होते. त्यानंतर ५ नोव्हेंबर रोजी शुक्ला यांना पदावरून दूर करीत, त्यांना निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. निवडणूक आयोगाने सोमवारी आचारसंहिता संपविण्याबाबतची अधिसूचना जारी केली. त्याचवेळी शुक्ला यांचा रजेचा कालावधी संपुष्टात आला. गृहविभागाने हा पदभार विद्यमान महासंचालक संजय कुमार वर्मा यांच्याकडून स्वीकारण्याबाबतचे परिपत्रक जारी केले. त्यानंतर IPS Rashmi Shukla शुक्ला यांनी गृहमंत्री देवेंद्र फडवीसांची भेट घेतली आणि पदभार स्वीकारला.