राज्यसभेच्या सहा जागांसाठी २० डिसेंबरला पोटनिवडणूक

    दिनांक :26-Nov-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
Rajya Sabha by-election चार राज्यांत रिक्त असलेल्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी २० डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे, अशी घोषणा निवडणूक आयोगाने मंगळवारी केली. वेंकटरमण राव मोपिदेवी, बीधा मस्थान राव यादव आणि रायगा कृष्णय्या या वायएसआरपीच्या सदस्यांनी ऑगस्टमध्ये राजीनामा दिल्याने आंध्रप्रदेशात राज्यसभेच्या तीन रिक्त झाल्या. यादव आणि कृष्णय्या यांचा राज्यसभेचा कार्यकाळ २१ जून २०२८ रोजी, तर मोपिदेवी यांचा २१ जून २०२६ रोजी कार्यकाळ संपुष्टात येणार होता.
 
 
election
 
Rajya Sabha by-election ओडिशातील सुजीतकुमार यांनी बीजदचे सदस्यत्व सोडल्याने येथे एक जागा रिक्त झाली. नंतर पक्षाने त्यांना काढून टाकले. त्यांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२६ पर्यंत होता. कोलकाता येथे अत्याचारानंतर डॉक्टरची हत्या झाल्यावर तृणमूल काँग्रेसचे सदस्य जवाहर सरकार यांनी राजीनामा दिल्याने बंगालमध्ये जागा रिक्त झाली. त्यांची कारकीर्द एप्रिल २०२६ पर्यंत होती. हरयाणा विधानसभेत निवडून आल्यानंतर भाजपाच्या कृष्णलाल पनवार यांची जागा रिक्त आहे. अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकींचा फायदा तेदेपाला आंध्रप्रदेशात आणि भाजपाला ओडिशात होणार आहे. बंगालमधून तृणमूलचा सदस्य निवडून येईल, भाजपा हरयाणा कायम ठेवेल.