‘इस्कॉन’वरील बंदीसाठी बांगलादेशात याचिका

27 Nov 2024 19:00:19
- हिंदूविरोधी कांगावा सुरूच!
 
ढाका, 
Bangladesh ISKCON Temple : बांगलादेश सरकारच्या हिंदू धर्माविरोधातील कारवाया सुरू आहेत. आता या हिंदू संघटनेवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. बांगलादेश सरकारने इस्कॉनला धार्मिक कट्टरतावादी संघटना म्हणून संबोधले. या संघटनेची चौकशी सुरू असल्याचे बुधवारी सांगितले. दरम्यान, सनातनी जागरण ज्योत या हिंदू संघटनेचे प्रवक्ते चिन्मय प्रभू यांना बांगलादेशातील मोहम्मद युनूस सरकारने देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक केली. या कारवाईविरोधात निदर्शने सुरू आहेत.
 

ISKCON Temple 
 
बांगलादेशात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी ३० ऑक्टोबर रोजी चिन्मय प्रभू यांच्यासह १९ जणांवर देशद्रोह कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघांना अटकही करण्यात आली आहे. २५ ऑक्टोबर रोजी सनातन जागरण मंचने चितगाव येथील लालदिघी मैदानावर आठ कलमी मागण्या घेऊन रॅली काढल्याचा आरोप आहे. यावेळी चौकात असलेल्या आझादी काही लोकांनी भगवा ध्वज फडकावला होता. या ध्वजावर आमी सनातनी असे लिहिले होते. याबाबत चिन्मय प्रभू यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान आणि अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
 
Bangladesh ISKCON Temple : इस्कॉनने निवेदनात म्हटले आहे की, चिन्मय प्रभू हे बांगलादेशातील अल्पसंख्यकांच्या हक्कांसाठी बोलतात. सरकारनेही नागरिकांच्या हक्कांचे रक्षण केले पाहिजे. बांगलादेश हे आपले जन्मस्थान आणि पूर्वजांचे घर आहे. बांगलादेशचे नागरिक असल्याचा आम्हाला अभिमान आहे, जिथे आमचे अनेक आचार्य आणि संत जन्मले. नागरिक म्हणून आम्हाला बांगलादेशच्या वर्तमान आणि भविष्यातील सरकारांसोबत शांततापूर्ण सहकार्याने राहायचे आहे. परंतु, आम्ही मागणी करतो की, सरकारने न्याय सुनिश्चित केला पाहिजे. देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचा धर्म आणि परंपरा पाळण्याचे स्वातंत्र्य असावे.
Powered By Sangraha 9.0