"मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा".... फडणवीसांचा व्हिडिओ अचानक पुन्हा व्हायरल

27 Nov 2024 18:59:54
Fadnavis video viral देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा ही आता केवळ औपचारिकता असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, फडणवीस यांचा एक जुना व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते पुन्हा येण्याचा दावा करत आहे.महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार ? याचा निर्णय उद्याच्या महायुतीच्या बैठकीत होणार आहे. आज महायुतीच्या बैठकीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याची घोषणा केली आहे. अजित पवार यांनी यापूर्वीच मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. अशा परिस्थितीत आता सर्वांच्या नजरा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लागल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा ही आता केवळ औपचारिकता राहिली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते पुन्हा येण्याचा दावा करत आहे.
 
 
video
 
 
पाच वर्षे जुना व्हिडिओ व्हायरल
देवेंद्र फडणवीस Fadnavis video viral यांचा हा व्हिडिओ पाच वर्षे जुना आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात ते पुन्हा परतणार असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस यांनी काव्यमय शैलीत आपले म्हणणे मांडले. ते म्हणाले "मेरा पाणी उतरता देख,मेरे किनारेपर घर मत बसा लेना,मैं समंदर हू लौटकर वापस आऊंगा". देवेंद्र फडणवीस यांचा हा जुना व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.
उद्या दिल्लीत महायुतीची बैठक होणार
उद्या दिल्लीत होणाऱ्या Fadnavis video viral महायुतीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मंजुरी दिली जाईल, असे मानले जात आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे व आदींनी आज दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. शिवसेनेचे खासदार अमित शहा यांची भेट घेत असतानाच एकनाथ शिंदे मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याची घोषणा केली. मुख्यमंत्रीपदाची इच्छा नसल्याचे त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी काल राजीनामा दिला होता
याआधी, काल Fadnavis video viral  एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली. राज्यपालांनी शिवसेना नेत्याला पुढील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपर्यंत हंगामी मुख्यमंत्री राहण्यास सांगितले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीने २८८ पैकी २३० जागा जिंकून चमकदार कामगिरी केली. महायुतीचा घटक असलेल्या भाजपने १३२, शिंदे यांच्या शिवसेनेने ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ४१ जागा जिंकल्या.
Powered By Sangraha 9.0