सीन CUT झाला, पण तो थांबलाच नाही...

27 Nov 2024 14:27:10
मुंबई,
Kissing Scene :  रुपेरी पडदा, कलाविश्व, प्रसिद्धी आणि प्रचंड पैसा... सेलिब्रिटींच्या आयुष्याकडे पाहिलं की वरवर दिसणाऱ्या या सर्व गोष्टींचा सर्वांनाच हेवा वाटतो. प्रत्यक्षात मात्र ज्याप्रमाणं नाण्याच्या दोन बाजू असतात तशीच या झगमगणाऱ्या विश्वाचीही एक दुसरी बाजू आहे, जी समोर येताच अनेकांना धक्का बसतो. बी टाऊनमधील अशाच एका प्रसंगावर एका लोकप्रिय अभिनेत्रीनं भाष्य करत उजेड टाकला आहे.
चित्रीकरणादरम्यान, चालू सीनमध्येच घडलेला प्रकार या अभिनेत्रीनं सर्वांसमोर आणला. ही अभिनेत्री आहे सयानी गुप्ता. एका चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं आणि त्याचदरम्यान एक Kissing Scene चित्रीत होत होता. पण, सीन संपताच दिग्दर्शकानं 'कट' म्हटलं तरीही तो अभिनेता मात्र सयानीपासून दूर गेला नाही. हे सर्वकाही तिच्यासाठी इतकं विचित्र होतं, की आजतागायत ती तो प्रसंग विसरू शकलेली नाही.

Sayani Gupta
 
'रेडियो नशा'ला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान सयानीनं सीरिज किंवा चित्रपटाच्या सेटवर सुरु असणाऱ्या चित्रीकरणादरम्यानच्या इंटिमसीसंदर्भात वक्तव्य केलं. Kissing Scene बदलत्या काळानुरूप अनेक गोष्टींमध्ये सकारात्मक बदल झाले, असं सांगताना आजच्या दिवसांमध्ये कोणत्याही प्रणयदृश्याच्या चित्रीकरणादरम्यान सेटवर 'इंटिमसी कोऑर्डिनेटर' आणि या दृश्यांसाठीचे विशेष दिग्दर्शक असतात असंही तिनं सांगितलं.
सयानी तिच्या कारकिर्दीतील एक गंभीर प्रसंग मात्र अद्यापही विसरु शकलेली नाही. याविषयीच सांगताना ती म्हणाली, 'इंटिमसीविषयी मी एक संपूर्ण पुस्तक लिहू शकते. आता मात्र खरंच ही दिलासादायक बाब आहे की सेटवर इंटिमसी कोऑर्डिनेटर असतात. Kissing Scene २०१३ मध्ये मी ''मार्गरीटा विद ए स्ट्रॉ'' चित्रपटामध्ये काम केलं होतं. काहींच्या मते इंटिमेट सीन करणं सोपं होतं कारण सर्वकाही तंत्रशुद्ध पद्धतीनं पार पडतं. पण, याच सीनच्या बहाण्यानं काहीजण या संधीचा फायदाही घेतात'.
आपण स्वत: या अशा प्रसंगाला तोंड दिलं आहे असं ती म्हणाली. 'एक अभिनेता दिग्दर्शक वारंवार कट बोलूनही मला किस करतच होता. अनेकदा या सर्व गोष्टी लहान वाटतात. Kissing Scene पण, हा असा प्रकारस सहजपणे घडत नाही. हे सर्वकाही अभद्र आहे', असं सांगत सयानीनं नाव न घेता सहकलाकारावरच ताशेरे ओढले.
Powered By Sangraha 9.0