उत्तरप्रदेशातील दरोडेखोराला १७ वर्षांनी ठाण्यात अटक

27 Nov 2024 17:31:34
ठाणे, 
उत्तरप्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने ठाणे पोलिसांच्या मदतीने येथे Robber arrested दरोडेखोराला अटक केली. तो २००७ पासून फरार होता. सतीश बाबुलाल गुप्ता, असे त्याचे नाव असून, ठाण्यातील वागळे इस्टेट भागातून त्याला सोमवारी सायंकाळी अटक करण्यात आली,
 
 
Robber arrested
 
Robber arrested असे खंडणी विराधी कक्षाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. हा मूळचा उत्तरप्रदेशातील उन्नावचा रहिवासी आहे. त्याने उत्तरेकडील राज्यात दरोडा घातला होता, असे त्यांनी सांगितले. ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलच्या मदतीने उत्तरप्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतर त्याला पकडले, असे अधिकार्‍याने सांगितले.
 
Powered By Sangraha 9.0