जनतेने मविआचा करेक्ट कार्यक्रम केला

27 Nov 2024 17:58:52
bawankule assembly 2024 महायुती सरकार उत्तम काम करू शकते हा विश्वास असल्यानेच महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेने मते दिली आहेत. महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर अविश्वास दाखवून मतदारांचा अपमान केला जात आहे.लोकसभेच्या पराभवाचे आम्ही आत्मचिंतन केले, त्यातून शिकलो व पुढे गेलो आणि जिंकलो. जनतेने डबल इंजिन सरकारला मतं दिली आहेत. जनतेने मविआचा करेक्ट कार्यक्रम केला आहे तसेच ४४० व्होल्टचा करंटही दिला आहे. अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
 
 
BAWANKULE 
 
 
कोराडी(नागपूर) येथील bawankule assembly 2024 जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. नांदेडच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला, त्या ठिकाणी ईव्हीएम चांगली होती का? असा प्रश्नही बावनकुळे यांनी केला. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील मतदारांनी महायुती सरकारच्या योजनांना मत दिले आहे. आमचे सरकार उत्तम काम करू शकते, असा जनतेचा विश्वास आहे, म्हणूनच हा जनादेश मिळाला आहे. लोकसभेत मविआचे खासदार निवडून आले, तेव्हा ईव्हीएम चांगली होती. सध्या महाविकासवाल्यांना झोप लागत नाही. त्यांना जेव्हा झोप लागायला लागेल तेव्हा ते शांत होतील. महाविकासच्या लोकांनी तोंडाच्या वाफा काढण्यापेक्षा आपली मते का कमी झाली याचे चिंतन करावे.
तीन पक्षांचे सरकार बनवताना थोडा वेळ लागतोच, मंत्रीपद कसे वाटायचे, कोणाला कोणते खाते द्यायचे, पालकमंत्री कुठे कोण?असेल हे सर्व सूत्र तयार करून सरकार तयार होते. नुसतेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे नाव निश्चित करणे एवढेच नसते. त्यामुळे, काही काळ जाईल आणि लवकरच सरकार बसेल. शपथ नोव्हेंबर मध्ये होईल की डिसेंबर मध्ये होईल, हे काही पॅरामीटर नाही. सध्या काळजीवाहू सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.
• मुख्यमंत्री महायुती सरकारचाच होणार!
भारतीय जनता पार्टीच्या bawankule assembly 2024 प्रत्येकाला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते. महायुतीमधील मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना त्यांचे नेते मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा आहे. यावर, तिन्ही पक्षाचे नेते बसून निर्णय घेतील. केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयावर भाजपाचा कार्यकर्ता कधीच नाराज होत नाही. त्यांचा निर्णय अंतिम असतो. पक्षाचे नेते योग्य निर्णय करतात. लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री शपथ घेणार. उद्धव ठाकरेंनी जेव्हा भाजपासोबत बेईमानी केली, तेव्हा त्यांना सरकार बनवण्यासाठी दीड महिना लागला होता, असाही टोला बावनकुळे यांनी लगावला.
Powered By Sangraha 9.0