'माझं लग्न झालं, माझं वजन वाढलंय...' सोनाक्षी सिन्हा तिच्या बॉडी इमेज बद्दल उघडपणे बोलली

27 Nov 2024 19:29:56
sonakshi sinha बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आजकाल तिच्या वैवाहिक जीवनाचा खुलेपणाने आनंद लुटताना दिसत आहे. अलीकडेच कपिल शर्माच्या शोमध्ये पती झहीर इक्बाल आणि वडील शत्रुघ्न सिन्हासोबत दिसणारी ही अभिनेत्री आता करीना कपूरच्या शोमध्ये पाहुणी म्हणून गेली होती. तिच्या मुलाखतीत सोनाक्षीने सांगितले की, तिला तिच्या वजनाबद्दल नेहमीच ट्रोल केले जाते. अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा मी बारीक होते आणि जेव्हा मी लठ्ठ झाले तेव्हाही लोक नेहमी बोलायचे...' सोनाक्षीने असेही सांगितले की लग्नानंतरही तिचे वजन वाढले आहे.
 
  
sonakshi sinha
 
 
माझे वजन खूप जास्त होते
सोनाक्षी सिन्हा sonakshi sinha नुकतीच करीना कपूरच्या "व्हॉट वुमन वॉन्ट" या शोच्या पाचव्या सीझनमध्ये पाहुणी म्हणून दिसली. या शोमध्ये करिनाने सोनाक्षीला विचारले की, ती नेहमी बॉडी पॉझिटिव्हिटीबद्दल बोलते, तूही या विषयावर खुलेपणाने बोलली आहेस. आज हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. मग यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे? यावर सोनाक्षी म्हणाली, आम्हाला सर्वांना तुमच्याकडून प्रेरणा मिळते. तुमचे शरीर कसे आहे, तुमची त्वचा कशी आहे ? हे महत्त्वाचे नाही, तुम्ही तुमच्या शरीराबद्दल नेहमीच सकारात्मक राहायला हवं.' सोनाक्षी पुढे म्हणते, 'जेव्हा माझे वजन खूप जास्त होते. बरेच लोक माझ्या वजनाबद्दल बोलायचे. मला सगळ्यांच तोंड बंद करावं असे वाटलं… आणि लवकरच मला जाणवलं की माझं वजनच माझ्यासाठी सर्वस्व नाही. त्यामुळेच, कदाचित लहानपणापासूनच ही विचारसरणी माझ्या मनात रुजली असावी. त्याने मला खूप मदत झाली.
मला वाटले लोक बोलतील
अभिनेत्री पुढे sonakshi sinha म्हणते, 'जेव्हा मी दबंग सिनेमा केला तेव्हा मी खूप बारीक झाले होते. मी कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच इतकी बारीक झाली होती. पण तरीही लोक माझ्या वजनाबद्दल बोलायचे. मग मला वाटले की मी चांगली असूनही लोक माझ्याबद्दल बोलत आहेत. तेव्हा मला वाटले की लोक नक्कीच बोलतील. आता तू तुझं काम कर आणि पुढे जा.' ती पुढे म्हणाली, 'मला आठवतं की माझ्याकडे कधीच कोणता आदर्श नव्हता, ज्यांना बघून मी म्हणू शकेन, मी त्यांच्यासारखी होऊ शकते. म्हणून, माझ्यासाठी निरोगी शरीराची प्रतिमा दाखवणे खूप महत्वाचे आहे.
लग्नानंतर तिच्या sonakshi sinha वाढत्या वजनाबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, 'आता माझे लग्न झाले आहे, माझे वजन वाढले आहे पण मी आनंदी आहे. मी हा सर्व काळ खूप एन्जॉय करत आहे. प्रत्येकाला माझ्यासोबत लंच आणि डिनर करायचं असतं. अजून काय हवंय? मला फक्त आयुष्यात आनंदी राहायचं आहे.
अनेक कलाकारांची तक्रार आहे की लग्नानंतर, त्यांच्या व्यस्त शेड्युलमुळे त्यांना हनीमूनला जाण्यासाठी वेळ मिळत नाही. पण सोनाक्षी सिन्हा आहे, जी लग्नानंतर एक-दोनदा नाही तर चार वेळा हनिमूनला गेली आहे. सध्या अभिनेत्री तिचा पती झहीर इक्बालसोबत इटलीमध्ये ४ था हनीमून एन्जॉय करत आहे.
Powered By Sangraha 9.0