अखेर सत्य बाहेर आले

28 Nov 2024 05:50:00
प्रासंगिक
- मनोज रघुवंशी
'The Sabarmati Report' : २००२ मध्ये गोध्रा येथील साबरमती एक्स्प्रेसमध्ये जिवंत जाळलेल्या रामभक्तांबद्दल वामपंथी आणि सेक्युलर डाव्या आणि धर्मनिरपेक्ष माध्यमांनी जाणीवपूर्वक खोटे नॅरेटिव्ह पसरवले होते, असे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाने स्पष्ट केले आहे. ‘हा तर निव्वळ एक अपघात होता’, ‘कदाचित स्टोव्हचा भडका उडाला असावा’ ‘सिगारेटच्या ठिणगीमुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे ट्रेनला आग लागली असावी’ असा खोटा प्रचार या सेक्युलर मीडियाने जाणीवपूर्वक केला होता. गोध्राचे सत्य कट कारस्थान रचून लपवण्यात आले होते तसेच त्यानंतर झालेल्या दंगली अतिशयोक्तीपूर्ण आणि मूळ घटनांचा विपर्यास करून दर्शविण्यात आल्या होत्या, यात दुमत असण्याचे कारण नाही. पण ‘द साबरमती रिपोर्ट’ या गुजरात दंगल हा विषय हाताळण्यात आलेला नाही. त्यामुळे यात तिस्ता सेटलवाड यांच्या कारनाम्यांचा उल्लेेख नाही. या चित्रपटाची निर्माती एकता कपूर यांच्याकडून तुम्ही फार काही अपेक्षा करू शकत नाही. पण तिने एक छोटेसे काम या चित्रपटाच्या माध्यमातून केले आहे. हे तिच्या सामान्य क्षमतेपेक्षा खूप जास्त आहे.
 
 
Sabarmati-2
 
गोध्रा येथील हिंदूंच्या भीषण पृष्ठभूमीवर तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त जेम्स मायकल लिंगडोह यांनी गुजरात विधानसभा निवडणुका सहा महिन्यांनी लांबवल्या होत्या, हे आपल्या सर्वांना आठवत असेलच. गोध्रा कांड आणि त्यामुळे उद्भवलेेल्या दंगली लोक विसरून जातील आणि त्याचा निवडणुकांवर होणारा परिणाम कमी होईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र ही सर्व समीकरणे पूर्णपणे अयशस्वी ठरली. विधानसभेच्या १८२ जागांपैकी १८१ जागांवर निवडणूक पार पडली. भाजपाला १२७ जागांवर विजय प्राप्त झाला आणि नरेंद्र मोदी दुसर्‍यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर नरेंद्र मोदींविषयी हिंदूंचा विश्वास वाढत गेला आणि आजही हिंदूंचा मोदींवर तितकाच विश्वास आहे, हे विविध प्रसंगातून दिसून आले आहे.
 
 
'The Sabarmati Report' : नरेंद्र मोदींच्या विजयानंतर ज्या पत्रकारांनी गोध्राचे सत्य दडपून टाकून नॅरेटिव्ह रचले होते त्यांना जबरदस्त धक्काच बसला. गोध्रा प्रकरणी सातत्याने हिंदूविरोधी केलेला अपप्रचार व गुजरातमध्ये ओतले गेलेले द्वेषाचे विष यापैकी काहीही त्यांच्या बोलवित्या धन्यांना मदत करू शकले नाही. अर्थात ज्या पत्रकारांनी गोध्राबाबतचे सत्य दडपण्याचा प्रयत्न केला ते वेळोवेळी उघडे पडले आहेत. अशाच एका घटनेची चर्चा होणे आवश्यक वाटते. ही २३ मार्च २००३ ची आहे. या दिवशी नवी दिल्लीच्या अशोक हॉटेलमध्ये रोटरी क्लबचा वार्षिक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात प्रस्तुत लेखकासह करण थापर, बरखा दत्त देखील सहभागी होते. जेव्हा गोध्रा आणि गुजरात निवडणुकीसंदर्भात चर्चा सुरू झाली तेव्हा हे सगळे पळून गेले. कारण या तथाकथित सेक्युलर पत्रकारांमध्ये सत्याला सामोरे धाडसच नव्हते.
 
 
या संदर्भात आणखी एका घटनेचा उल्लेख करावा लागेल. त्या दिवसांत उर्दू पत्रकारांनी विश्व हिंदू परिषदेचे डॉ. सुरेंद्र जैन आणि प्रस्तुत लेखकाला दिल्लीच्या प्रेस क्लबमध्ये विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले होते. आम्ही दोघे मोकळेपणाने बोललो. सर्व मुद्दे अतिशय स्पष्टपणे पुराव्यांसह मांडले. मात्र यानंतर उर्दू पत्रकारांनी गदारोळ सुरू केला. चर्चासत्रात अरुंधती रॉय देखील उपस्थित होत्या. ‘तुम्ही तुमचे असत्यकथन कबूल करून आणि ‘आउटलुक’ पत्रिकेत तुमचा माफीनामा प्रकाशित करून चांगले काम केले आहे’ असे प्रस्तुत लेखकाने अरुंधती रॉय यांना सांगितले. ‘काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्या मुलीवर हिंदूंनी बलात्कार केला आणि नंतर त्यांना जाळून ठार केले’ असे धडधडीत खोटारडे लिखाण रॉय यांनी आउटलुकमध्ये केले होते. पण अरुंधती रॉय यांचा हा खोटारडेपणा एहसान जाफरी यांच्या मुलीनेच उघडा पाडला. तिने अमेरिकेतून स्पष्टीकरण दिले की, मी माझे पती आणि मुलांसह अमेरिकेत सुरक्षित आहे. दंगलीच्यावेळी मी गुजरातमध्ये नव्हते किंवा कोणत्याही गुन्ह्याला बळी पडले नव्हते. जाफरी यांच्या मुलीने इतक्या रोखठोकपणे भूमिका स्पष्ट केल्यानंतर अरुंधती यांना सपशेल माफी मागावी लागली. अर्थात त्यांना माफी मागण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायच शिल्लक नव्हता. सत्याला धरून असलेल्या पत्रकाराचा व अखेरपर्यंत सत्यच समोर मांडणार्‍या समर कुमार या पत्रकाराचा शेवटी विजय होतो, असे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. तो प्रत्येक मृताचे नाव आणि वय सांगतो. ‘अयोध्येतील हुतात्म्यांना विसरू नका, विसरू नका’ हीच जणू तो प्रदर्शित करीत आहे.
 
 
'The Sabarmati Report' : चित्रपटातील एक दृष्य जबरदस्त आहे. २००७ मध्ये सत्याच्या शोधात निघालेल्या पत्रकार समर कुमार आणि अमृता गिल यांनी गोध्रा येथे पाहिले की तिथली सर्व मुले मग ती मदरशात सूरा क्रमांक ९, आयत क्रमांक ५ वाचणारी असो किंवा केंद्रीय विद्यालयात डार्विनची ‘थिअरी ऑफ इव्होल्यूशन’ शिकणारी असो, मुले भारतीय संघावर पाकिस्तान क्रिकेट संघाचा विजय आनंदात, नाचत, उड्या मारत साजरा करीत होती. भारताचा पराभव व पाकिस्तानचा विजय ही मुले दिवाळीसारखा साजरा करीत होती. दिवाळीत जसे फटाके फोडतात तसे पाकिस्तानच्या विजयानंतर फटाके फोडत होती. दृष्याच्या पृष्ठभूमीवर एक गाणे ऐकू येते. ज्याचा अर्थ असा ‘सद्दाम सुपारीवाला नामक एका मुस्लिमाने १,५०० लोकांचा जमाव जमवून निष्पाप कारसेवकांची निर्घृण हत्या केली असेल, पण भारतमातेबद्दल जेवढे प्रेम एकता कपूरच्या हृदयात आहे तितकेच प्रेम देशातील प्रत्येक मुस्लिम मुलाच्या हृदयात आहे. चित्रपटात ‘घिसे-पिटे’ डायलॉग आहेत, जसे दोन्ही बाजूंनी प्रामाणिक लोक असतात वगैरे. जणू निर्माता-दिग्दर्शक हे स्पष्टीकरण देत आहेत की गोध्रा कांडामागील सत्य आम्ही उघड आहे. आणि हे सत्य म्हणजे हा केवळ अपघात नव्हता, तर सद्दाम आणि साजिद सारख्या कट्टरपंथी मुस्लिमांनी पूर्वनियोजित घडवून आणलेला तो नरसंहार होता आणि त्यांचा मौलवी हबीब नामक ‘मास्टरमाईंड’ देखील होता. त्याला मेहरुन्निसा ही कथित प्रामाणिक स्त्री सल्ला देते की मौलवी हबीबने आता पाकिस्तानात निघून जावे. ‘तुम्ही कोणत्याही गैरसमजात राहू मजहब नही सिखाता आपस में बैर रखना, हिंदी हैं हम, वतन है हिन्दोस्तां हमारा’ अर्थात एकता कपूर सेक्युलर आहे आणि सेक्युलर राहील.
 
 
'The Sabarmati Report' : वास्तविक या चित्रपटात खूप काही दाखवता आले असते. पण ते दाखवले गेले नाही. चित्रपटात असे दाखवण्यात आले आहे की समर आणि अमृता जळलेल्या एस-६ डब्यात जातात, जिथे अमृताला समजावून सांगतो की केवळ स्टोव्हमधील एक लिटर तेलाने एवढी मोठी आग लागणे शक्य नाही किंवा सिगारेटच्या ठिणगीने देखील बोगीला आग लागू शकत नाही. वास्तविक इतकी साधी गोष्ट समजण्यासाठी व समजावून सांगण्यासाठी प्रत्यक्ष डब्यात जाण्याची गरज नव्हती. समजण्यासारखी गोष्ट म्हणजे घटनास्थळी फक्त दगड पडलेले होते, बादल्या नाहीत. जर सुमारे मुस्लिमांचा जमाव कारसेवकांना मारण्यासाठी नाही, तर वाचवण्यासाठी आला असता तर ते दगड घेऊन तेथे का गेले? तसेच डब्याचे दार बाहेरून तार बांधून बंद केला नसता तरीही तो उघडला नसता, असे चित्रपटात दाखविण्यात आलेले नाही? दरवाजा नेहमी आतल्या बाजूने उघडतो. जर गर्दी दरवाजाच्या आत शिरली तर दरवाजा ‘जाम’ होतो. चित्रपटाची मोठी दुर्बल बाजू म्हणजे चित्रपट संपल्यानंतर जेव्हा लोक उठून थिएटरबाहेर चालू लागतात तेव्हाच पडद्यावर लिहून येते ‘‘गोध्राचे कटकारस्थान रचल्याबद्दल ३१ गुन्हेगारांना शिक्षा झाली, त्यापैकी ११ जणांना फाशीची शिक्षा झाली आहे’’. म्हणजेच जी गोष्ट सर्वांत महत्त्वाची होती त्याकडेच नेमके प्रेक्षकांचे दुर्लक्ष होते. चित्रपटातील ही मोठी उणीव आहे. 
 
(पांचजन्यवरून साभार)
Powered By Sangraha 9.0