ईव्हीएममधून उमटला ‘राष्ट्रभक्तीचा हुंकार’

28 Nov 2024 06:00:00
वेध
- नीलेश जोशी
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘महाराष्ट्र हा भारताचा खड्गहस्त आहे’ असे म्हटले होते. Maharashtra Assembly elections महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सावरकरांच्या विधानाची विशेष आठवण होते. लोकसभा निवडणुकीत देशभर ‘संविधाना’बाबतच्या खोट्या गोष्टी रेटून सांगत जनमानसात भीती निर्माण करणार्‍यांना तेव्हा यश आपली क्लृप्ती खोटी का असेना, पण यशस्वी ठरल्याच्या आनंदात ही मंडळी होती. एवढेच नव्हे, तर महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावावर जाती-जातीत फूट पाडण्याचे षडयंत्र उपयोगी ठरत असल्याच्या उकळ्या सत्ताकांक्षींना फुटत होत्या. दुसरीकडे गठ्ठा मतदानासाठी तुष्टीकरणाची परिसीमा ओलांडल्याचे चित्र होते. केवळ सत्ता आणि त्यातून पैसा हाच एकमेव उद्देश असणार्‍यांना एकसंध समाज, देव, याच्याशी काहीच देणे-घेणे नसल्याचे दिसून येत होते. पण ज्यांच्या जीवनात देव, देश आणि धर्म याला प्राधान्य आहे, राष्ट्र प्रथम हा ज्यांच्या जीवनाचा मंत्र आहे असा बहुसंख्य समाज या सर्व प्रकाराने अस्वस्थ होता. त्यांची ही अस्वस्थता समाजातील सजग प्रहरींनी ओळखली आणि त्यानंतर राष्ट्रभक्तीच्या निखार्‍यावर फुंकर घालण्याच्या कामाला सुरुवात झाली. त्यातूनच राष्ट्रभक्तीचा हुंकार म्हणजेच नुकताच लागलेला महाराष्ट्र विधानसभेचा निकाल. आता हा निकाल अनेकांना अनाकलनीय, राक्षसी बहुमत वाटत आहे. पण संविधानाबाबतच्या खोट्या गोष्टी, जाती-जातीत दुही निर्माण करणारी नीती आणि कृती तर गठ्ठा मतांसाठी तुष्टीकरणाचा कळस गाठणारे ‘मी तुमच्या देवांचा बाप आहे’ असे म्हणणारे या निकालासाठी जबाबदार नाहीत का?
 
 
evm dsl
 
Maharashtra Assembly elections : महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांचा असल्याची करणार्‍या व स्वतःला तथाकथित धर्मनिरपेक्ष म्हणवणार्‍या राजकारणार्‍यांची कृती आणि उक्ती किती फोल आहे, याचेही दर्शन या निवडणुकीच्या माध्यमातून झाले तर स्वतःला हिंदुत्ववादी म्हणविणार्‍यांचा खोटारडेपणा प्रकर्षाने पुढे आला. कोण कुठला तो सज्जाद नोमानी नावाचा विकृत येथे येऊन गठ्ठा मतदान एका बाजूने करा, जे असे करणार नाहीत त्यांच्यावर बहिष्कार टाका, अशी प्रसारित करतो. दुसरीकडे हाच नोमानी मराठा आंदोलनाच्या प्रमुखाला भेटून एकत्र येत हिंदुत्वाला पराजित करण्याची भाषा बोलतो तर उलेमा संघटना १७ मागण्यांचे पत्र देतात. त्यात दंगलीतील गंभीर गुन्ह्यातील आरोपींना सोडून देणे, रा. स्व. संघासारख्या देशभक्त संघटनेवर बंदी आणण्यासहित विविध मागण्या होत्या. या मागण्यांबाबत सकारात्मक पाठिंब्यांची पत्रे स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणविणार्‍या राजकीय दिली. यातील कोणती बाब संवैधानिक होती? संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी जणू आमचीच असा टेंभा मिरविणार्‍यांना येथे संविधानाच्या पावित्र्याचे भान नव्हते का? एकीकडे तुष्टीकरणासाठी मुस्लिमांसमोर गुडघे टेकविणारे दुसरीकडे मात्र, औरंगजेब, अहमद शाह यांचे उदात्तीकरण करताना अहल्यादेवी, संभाजीराजे यांनादेखील नाकारत असल्याचे दिसून आले. व्होट जिहाद, वक्फ बोर्ड आणि लव्ह जिहाद या सर्वच क्षुब्ध झालेला बहुसंख्य हिंदू समाज निवडणूकनिमित्ताने ईव्हीएममधून व्यक्त झाला. हिंदू आणि हिंदुत्वाशी नाळ तुटलेल्यांना मग हा निकाल अनाकलनीय वाटायला लागला.
 
 
Maharashtra Assembly elections : लोकसभा निवडणुकीपासूनच खोट्या गोष्टी पसरवून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केवळ ‘हिंदुत्व’ पराभूत व्हावे या हेतूने केला गेला. खरं म्हणजे निवडणूक ही राजकीय पक्षांमध्ये लढली जाते. पण असे असताना स्वतःला कार्यकर्ते, पत्रकार म्हणविणारे अनेक जण केवळ हिंदू विचार संपावा म्हणून इरेस पेटले. या सर्वांनीच अक्षरशः अनेक षडयंत्र रचले. हिंदूंमधील जाती व्यवस्थेचा फायदा घेत जाती-जातीत भांडणे लावण्याचा प्रयत्न केला. संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याची खोटी आरोळी ठोकली. त्यावरही कळस म्हणजे मुस्लिमांचे गठ्ठा मतदान व्हावे असा अजेंडा राबविला. अर्थातच हा सत्ताकांक्षेसाठी केलेला डाव होता. हा डाव सर्वप्रथम हरयाणात हाणून पाडण्यात आला. यासाठी राष्ट्रभक्त समविचारी संघटना, व्यक्तींनी सूक्ष्म नियोजन केले. मनामनात असलेल्या देव, देश आणि धर्म या विचाराला फुंकर घातली. एवढेच नव्हे, तर देशहितासाठी १०० टक्के मतदान व्हावे म्हणून लाखो अराजकीय कार्यकर्ते कुठल्याही स्वार्थाशिवाय २० तारखेच्या सायंकाळपर्यंत कार्यरत होते. याचेच म्हणजे ईव्हीएममधून उठलेला राष्ट्रभक्तीचा हुंकार. आता काहींना तो अनाकलनीय तर काहींना राक्षसी वाटत असेल तर त्याला सामान्यजनांचा नाईलाज आहे. 
 
- ९४२२८६२४८४
Powered By Sangraha 9.0