काश्मीरपासून संभलपर्यंत कट्टरतावादी हिंसाचार

    दिनांक :28-Nov-2024
Total Views |
चौफेर
- शिवम दीक्षित
Sambhal Violence : उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात २४ नोव्हेंबर २०२४ रोजी एक गंभीर घटना उघडकीस आली. चंदौसी दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) न्यायालयाच्या आदेशानुसार शाही जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्यास दाखल झालेल्या चमूवर आणि पोलिस दलावर जमावाने जबरदस्त हल्ला तसेच दगडफेक केल्याची गंभीर घटना उघडकीस आली. प्राचीन हरिहर मंदिर पाडून त्या जागेवर शाही जामा मशीद बांधण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे न्यायालयाच्या सूचनेवरून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे (एएसआय) आणि पोलिसांचे पथक पाहणीसाठी आले होते. मात्र तेथे उपस्थित मुस्लिम जमावाने मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडविला. त्यामुळे परिस्थिती बनली.

Jihadi-1
 
Sambhal Violence : अशाप्रकारची ही काही एकमेव घटना नाही. तर अशा अनेक घटना देशभरात उघडकीस आल्या आहेत, जेथे मुस्लिम जमावाने अवैध अतिक्रमण, गुन्हेगारांचा तपास किंवा कायदेशीर कारवाईदरम्यान पोलिस दल आणि सर्वेक्षण पथकांवर हिंसक हल्ले केले आहेत. अशा घटनांमुळे केवळ कायदा व सुव्यवस्थेवरच परिणाम होतो असे नसून त्यामुळे सामाजिक सौहार्दावरही परिणाम होतो. जमावाकडून पोलिस दल आणि सर्वेक्षण पथकांवर झालेल्या हल्ल्यांच्या घटनांनी केवळ प्रशासनालाच अडचणीत आणले असे नसून त्यामुळे समाजात भीतीचे आणि अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटना अनेकदा धार्मिक जागेवरील वाद, बेकायदेशीर अतिक्रमण आणि गुन्हेगारांना अटक करण्याच्या विषयांशी संबंधित होत्या.
हा अहवाल २०२१ ते २०२४ या वर्षांत मुस्लिम जमावाने केलेले अतिक्रमण/ गुन्हेगारांचा तपास व चौकशीसाठी/अटकेसाठी पोहोचलेल्या पोलिस पथकावर/ सर्वेक्षण पथकावरील हल्ल्यांच्या १० प्रमुख घटनांवर आधारित आहे.
 
 
सर्वेक्षण पथकावर व पोलिसांवर मुस्लिम जमावाचा हल्ला
जामा मशिदीच्या सर्वेक्षणावर पोलिसांवर दगडफेक
(२४ नोव्हेंबर २०२४)
स्थान : संभल, उत्तर प्रदेश
वाद —: जामा मशीद-श्री हरिहर मंदिर वाद
विवरण : चंदौसी दिवाणी (वरिष्ठ विभाग) आदेशानुसार, शाही जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी (श्री हरिहर मंदिर उद्ध्वस्त करून त्यावर मशीद उभारण्यात आली आहे) गेलेल्या सर्वेक्षण पथकावर आणि पोलिसांवर संतप्त मुस्लिमांच्या जमावाने हल्ला केला (छर्रे व दगड लागून १५ पोलिस कर्मचारी जखमी झाले) आणि जबरदस्त दगडफेक केली. परिसरात जाळपोळ केली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला तर तणावपूर्ण परिस्थितीमुळे अनेक पोलीस जखमी आहेत.
 
 
मदरसाचे सर्व्हे करण्यास गेलेल्या पथकावर हल्ला
(१४ मे २०२४)
स्थान : अहमदाबाद, गुजरात
वाद : बेकायदेशीर मदरसा सर्वेक्षण
विवरण : गुजरातमधील दरियापूर भागात अवैध मदरशांच्या सर्वेक्षणादरम्यान, मुस्लिम जमावाने सर्वेक्षण पथक आणि पोलिसांवर जोरदार हल्ला केला. यातील मुख्य आरोपी व मास्टरमाईंड फरहान आणि यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी हिंसाचारामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली होती, त्यामुळे परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
 
 
मुस्लिम जमावाचा पोलिसांवर हल्ला
हल्द्वानी हिंसाचारात पोलिसांवर प्राणघातक हल्ला
(८ फेब्रुवारी २०२४)
स्थान : हल्दवानी, उत्तराखंड
वाद : सरकारी जमिनीवर अवैध मदरसा आणि मशीद
विवरण : बनभूलपुरा भागातील बेकायदेशीर मदरसा मशिदीचे अतिक्रमण हटवताना कट्टरवादी मुस्लिम जमावाने पोलिसांवर जबरदस्त दगडफेक केली यात ३०० हून अधिक पोलिस कर्मचारी जखमी झाले. बनभूलपुरा येथील पोलिस चौकी जाळणे आणि पोलिसांकडून रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतल्याप्रकरणी पोलिसांनी शोएब, सोहेल, समीर पाशा, इब्राहिम, साहिल अन्सारी आणि शानू अहमद यांच्यासह ३६ मुस्लिम दंगलखोरांना अटक केली.
 
 
इस्लामी जमावाच्या हल्ल्यात ३ जखमी
(२८ सप्टेंबर २०२४)
स्थान : भद्रक, ओडिशा
वाद —: इंटरनेट मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट
विवरण : पुरुनाबाजार पोलिस स्टेशन परिसरात सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवरील संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत कट्टरपंथी मुस्लिमांनी तोडफोड आणि जाळपोळ केली. पोलिसांनी हल्लेखोरांना रोखले असता त्यांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. हल्लेखोरांनी केलेल्या हिंसक हल्ल्यात तीन गंभीर जखमी झाले.
 
 
यति नरसिंहानंद गिरी यांचा शिरच्छेद करण्याची धमकी आणि पोलिसांवर हल्ला (४ ऑक्टोबर, २०२४)
स्थान : गाझियाबाद (उत्तर प्रदेश)
वाद : नरसिंहानंद गिरी यांच्यावर ईशनिंदेचा आरोप
विवरण : Sambhal Violence : डासना मंदिराचे मुख्य पुजारी यती नरसिंहानंद गिरी यांच्यावर २९ सप्टेंबर २०२४ रोजी मोहम्मद पैगंबरांवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप करून जमावाने ४ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘सर तन से जुदा’ च्या घोषणा देत डासना मंदिराबाहेर घोषणाबाजी केली. पोलिसांनी मंदिराच्या बाहेर नारे देण्यास मनाई केली असता धर्मांध जमावाने पोलिस दलावरच उलट हल्ला केला आणि जबरदस्त दगडफेक केली. या हल्ल्यात अनेक पोलिस कर्मचारी गंभीर रीत्या जखमी झाले.
 
 
बुरखाधारी महिलांची पोलिसांवर दगडफेक
गणवेशही (१२ ऑगस्ट २०२४)
स्थान : सहारनपूर, उत्तर प्रदेश
वाद - अमली पदार्थ तस्कर जावेदला अटक
विवरण : घाटमपूर गावात अवैध ड्रग्ज रॅकेट चालवणार्‍या जावेदला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर मुस्लिम जमावाने हल्ला केला. हल्लेेखोरांमध्ये बुरखा परिधान केलेल्या सुमारे अर्धा डझन महिलांचा समावेश होता. अमली पदार्थ तस्कर जावेदला सोडवण्यासाठी इकरामसोबत आलेल्या जमावाने आधी पोलिस पथकावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला आणि नंतर जबरदस्त दगडफेकही केली. एवढेच नव्हे तर मुस्लिमांच्या या जमावाने काही पोलिसांचा गणवेषही फाडला.
 
 
जमावाचा पोलिस ठाण्यावर हल्ला, दोन पोलिस जखमी (१२ ऑगस्ट, २०२४, छतरपूर, मध्य प्रदेश)
वाद : रामगिरी महाराजांच्या विधानावरून हिंसाचार
विवरण : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या रामगिरी महाराज यांच्याविरोधात छतरपूर काँग्रेसचा उपाध्यक्ष हाजी शहजाद याच्या नेतृत्वाखालील मुस्लिम जमावाने छतरपूर पोलिस स्टेशनला आग लावली. हा हिंसाचार इतका भीषण होता की पोलिस ठाण्यात उपस्थित असलेल्या पोलिसांना आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला. या दगडफेकीत दोन पोलिस कर्मचार्‍यांसह पोलिस ठाणे प्रभारी गंभीर रीत्या जखमी झाले.
 
 
ट्रकमध्ये दगड, पोलिसांवर हल्ला
(१६ जून २०२३)
स्थान : जुनागड, गुजरात
वाद —: दर्ग्याच्या स्वरूपात बेकायदेशीर अतिक्रमण
विवरण : जुनागढमध्ये दर्ग्याच्या बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत जारी केलेल्या नोटिसच्या निषेधार्थ धर्मांध व जिहादी मुस्लिमांनी ‘अल्ला हू अकबर’ आणि ‘नारा-ए-तकबीर’ च्या घोषणा पोलि दलावर हल्ला केला. हल्ल्यासाठी ट्रकमधून दगड आणल्याचे तपासात आढळून आले. सुमारे ५०० ते च्या संख्येत मुसलमानांचा हा जमाव चालून आला. जमावाने पोलिसांवर केलेल्या या हल्ल्यात महिलांचाही मोठ्या संख्येत समावेश होता.
 
 
गुंड नोमानला पकडण्यास आलेल्या पोलिसांवर हल्ला
(१८ मे २०२२)
स्थान : मथुरा, उत्तर प्रदेश
वाद : गुन्हेगार नोमन अटक प्रकरण
विवरण : हरयाणा पोलिसांच्या पथकासह पोलिस ठाण्याचे पोलिस जंगवली गावात गुन्हेगार नोमानच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेले होते. यावेळी गावातील मुस्लिम महिला आणि पुरुषांनी पोलिसांवर जबरदस्त हल्ला केला. यावेळी दंगलखोरांनी पोलिसांवर दगडफेक केली. एवढेच नव्हे तर छतावरून गोळीबारही केला.
 
 
जुनैदच्या मृत्यूनंतर जमावाचा पोलिसांवर हल्ला
(१२ जून २०२१)
स्थान : मेवात, हरयाणा
वाद : फरीदाबाद पोलिसांच्या मृत्यू
विवरण : फरीदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने जुनैद नावाच्या व्यक्तीला फसवणूक प्रकरणात अटक केली. मात्र, पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कोठडीत त्याचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी पोलिसांना लक्ष्य करून हल्ला केला आणि पोलिसांच्या वाहनाला आग लावली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात दंगलखोर ‘आग लावा, आग’ अशी घोषणा असल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत.
२०२१ ते २०२४ पर्यंतच्या या घटनांनी इस्लामिक कट्टरतावाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यांचा धोकादायक प्रभाव अधोरेखित केला आहे. या घटनांमुळे केवळ कायदा आणि सुव्यवस्थेलाच आव्हान दिले असे नसून त्या समाजांतर्गत सांप्रदायिक असंतुलन आणि कट्टरपंथी विचारसरणीच्या वाढत्या प्रभावाचेही द्योतक आहेत.
 
 
Sambhal Violence : धर्मांध मुस्लिमांच्या या हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणात पोलिस जखमी सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले, समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले. कायदा आणि सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष आणि हिंसक प्रतिक्रियांमुळे हे स्पष्ट होते की इस्लामिक कट्टरतावादी घटक केवळ सरकारी कारवाईलाच विरोध करीत आहेत असे नसून आपला व्यक्तिगत व सामूहिक अजेंडा बहुसंख्यक समाजावर जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करीत आहेत. बर्‍याचदा असे दिसून आले आहे की जहाल इस्लामिक आपल्या हक्कांसाठी वेळोवेळी संविधानाचा दाखला देत फिरत असतात आणि दुसरीकडे घटनात्मक प्रक्रियेतून घेण्यात आलेले निर्णय मान्य करण्याऐवजी तेच संविधान बाजूला सारून जाळपोळ, दंगली करून रस्त्यावर हाहाकार माजवताना दिसतात.
 
 
अशा हल्ल्यांचा परिणाम दीर्घकालीन असतो. या घटनांमुळे प्रशासनाची ताकद कमकुवत होते, स्थानिक गैर-धार्मिक रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि व सुव्यवस्थेला हानी पोहोचते. जिहादी, मूलतत्त्ववादी विचारसरणीचा प्रसार हा समाजाला धोका तर आहेच, पण विकास आणि शांततेसाठी देखील तो अडथळा आहे, हे स्पष्ट आहे. सरकारने या घटनांपासून धडा घेऊन कट्टरतावादी विचारधारा आणि बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत. कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर त्वरित आणि कठोर कारवाई करणे आवश्यक जेणेकरून कोणत्याही प्रकारचा हिंसाचार आणि उन्माद खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश समाजापर्यंत जाईल.
 
 
Sambhal Violence : तसेच मूलतत्त्ववादी विचारसरणीच्या विरुद्ध एकत्र येऊन शांततापूर्ण संवादाला प्राधान्य देणे ही समाजाची जबाबदारी आहे. या आव्हानांचा वेळीच समाधानकारकपणे सामना केला नाही तर त्याचा समाज आणि देशाच्या सर्वांगीण विकासावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच कायद्याचे संविधानाचे पालन करणे प्रत्येकासाठी अनिवार्य झाले पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत समाजात शांतता आणि सलोखा प्रस्थापित झाला पाहिजे.
(पांचजन्यवरून साभार)
 
 
‘पोलिसांची शस्त्रे हिसकावून घ्या, जाळपोळ करून ठार मारा’
कट्टरपंथीयांचा धिंगाणा, एफआयआरमधून खुलासा
- कुलदीप सिंह
Sambhal Violence : उत्तर प्रदेशातील संभल येथील कथित जामा मशिदीच्या सर्वेक्षणाच्या दिवशी ज्या प्रकारे मुस्लिम कट्टरवाद्यांनी हिंसाचार, दगडफेक जाळपोळ केली, त्यावरून मुस्लिम कट्टरतावाद्यांचा उन्मादी जमाव सर्वांना गिळंकृत करण्यास उतावीळ असल्याचे दिसून आले. जमावातून हे कट्टरपंथी बिनधास्तपणे नाव घेऊन ओरडत होते. ‘हसन, अजीम, सलीम, रिहान, हैदर, वसीम, अयान या सर्वांनी एकत्र येऊन पोलिसांची सर्व शस्त्रे हिसकावून घ्यावी आणि त्यांना आगीत जाळून ठार मारावे, असे या जमावातील कट्टरवादी ओरडत पोलिसांनी आपल्या एफआयआर अहवालात हा खुलासा केला आहे. ‘एकही पोलिस जिवंत राहता कामा नये’ असे हे जिहादी कट्टरतावादी जोरजोरात ओरडत असल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये उघड झाले आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीत जामा मशिदीचे सर्वेक्षण होऊ देणार नाही, असे हे धर्मांध लोक ओरडत होते. सुनियोजित कटाचा भाग म्हणून हा हिंसाचार आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हिंसाचाराच्या दरम्यान, उन्मादी जमावाने हत्येचा प्रयत्न करत पोलिसांवर गोळीबार केला. एवढेच नव्हे तर पोलिसांचे ९ एमएम पिस्तूलही त्यांनी हिसकावले. पिस्तुलात १० गोळ्या होत्या. हिंसाचार करण्यापूर्वी दंगलखोरांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले होते जेणेकरून त्यांची कृत्ये पकडली जाऊ नयेत. यावरून दंगलखोरांनी किती पद्धतशीर नियोजन केले हे लक्षात येते.
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, सुमारे १५०-२०० दंगलखोर संभलमधील नखासा चौकात जमले आणि त्यांनी सर्व सीसीटीव्ही फोडले. यानंतर अचानक त्यांच्या हातात हॉकी स्टिक, लाठ्याकाठ्या आणि दगड आले आणि त्यांनी पोलिसांवर जोरदार हल्ला केला. दंगलखोरांचा एकूण जमाव ८००-१००० च्या आसपास होता, असा पोलिसांचा दावा आहे.
 
पोलिसांवरील हल्ला नियोजित : पोलिस महासंचालक
उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी संभल येथील घटनेमागे कटकारस्थान असल्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, दंगलखोरांनी ज्या प्रकारे थेट पोलिसांवर हल्ला केला, त्यावरून हा नियोजनबद्ध कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, प्रत्येक बाबी लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या हिंसाचारात जणांचा मृत्यू झाला होता. तर डझनहून अधिक पोलिस जखमी झाले.
(पांचजन्यवरून साभार)